Sunday, 8 March 2026

वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण

 वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण

मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचीही योजना आहे. वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे. तसेच अटल सेतूला जोडून सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई’ विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. कर्नाळासाई आणि चिरनेर नवनगर तसेच नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात ही ग्रीनफिल्ड शहरे उभारली जाणार आहेत.

 

याशिवाय वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी मोठे केंद्र उभारण्याची योजना आहे. मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि 10 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचाही सरकारचा मानस आहे.

पायाभूत सुविधांच्या व्यापक योजना

 पायाभूत सुविधांच्या व्यापक योजना

राज्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणेविरार आणि बोईसर स्थानके 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

अटल सेतू परिसरात सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख रोजगारनिर्मिती होईल.

आर्थिक क्षेत्रात राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढवण्याचे उद्दिष्ट

 आर्थिक क्षेत्रात राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचा कृषी क्षेत्राचा जीडीपी 55 अब्ज डॉलर्सवरून 500 अब्ज डॉलर्सउद्योग क्षेत्राचे उत्पादन 123 अब्ज डॉलर्सवरून 1500 अब्ज डॉलर्सतर सेवा क्षेत्राचे उत्पादन 312 अब्ज डॉलर्सवरून 3000 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे

 बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे नवीन रुग्णालयनर्सिंग कॉलेज आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असून ताणतणावमानसिक आरोग्य आणि जीवनशैलीजन्य आजारांवर उपचारासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय मुंबई महानगर परिसरात सर्वांगिण आरोग्य आणि वेलनेसचे जागतिक केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव आहे

महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अ‍ॅडव्हान्समेंट (महिमा) या संस्थेची स्थापना

 महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अ‍ॅडव्हान्समेंट

(महिमा) या संस्थेची स्थापना

  परदेशी नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन यासाठी ‘महिमा’ संस्थेतून मार्गदर्शन करण्यात येईल.तसेच  समुपदेशन सेवा विस्तार आणि अधिक संघटित व्यवस्थेसाठी 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल.

 

शिक्षण आणि स्टार्टअपसाठी नवे धोरण

 शिक्षण आणि स्टार्टअपसाठी नवे धोरण

 

युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी नवी मुंबई येथे एज्युसिटी’ उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार नवी मुंबईत 6 देशांतील विद्यापीठे याचवर्षी सुरु होणार आहेत. याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करणार असून भविष्यात राज्यात ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करण्याचा मानस आहे.

स्टार्टअप आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी पुढील पाच वर्षांत 1.25 लाख उद्योजक तयार करणे आणि 50 हजार स्टार्टअप उभारणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेंतर्गत इस्त्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी या योजनेतून मिळेल.

 

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

 महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  एकल महिला धोरण राबवण्यात येणार असून त्यासाठी  सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणण्यात येईल. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांनाही अर्थसंकल्पात चालना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू ठेवण्यात येणार असून महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी १३ जिल्ह्यांत उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. राज्यात आतापर्यंत 3लाख लखपती दीदी’ तयार झाल्या असून पुढील काळात आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi