Sunday, 8 March 2026

विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज

 या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.

पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

 पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 

मुंबईदि. : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरापश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिलादिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखलेज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. 

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशनलोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरातउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व श्रीमती स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.

संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

            मुंबईदि.7 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या लोकप्रिय गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 8 मार्च2026रोजी रात्री 8:15 वाजता यशवंत नाट्यमंदिरमाटुंगामुंबई येथे संपन्न होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून राना चॅटर्जीसरीता राजेशसन्नी सिंगसंगीता मेलेकर यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे समन्वय योर इंडीयन मेलोडीज ही करत आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा आस्वाद सर्वांनी घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे  यांनी केले आहे.

0000

Saturday, 7 March 2026

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.

 भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे 80 हजार नवीन रुग्ण आढळतात व 42 हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार 16 व 18 पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रेग्रामीण रुग्णालयेजिल्हा रुग्णालयेमहानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.

कालभैरवअकरा भैरवांचे अधिपती

 ⛳ *🔸कालभैरव.🔸*⛳


*श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु. त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय. हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात.*


*काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष. नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्युपेक्षाही भयानक आहेत. उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.  त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो. शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो. सदगुरु हे कामधेनु आहेत. श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.*


*श्री काळभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र, ब्रम्हदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते. लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही.*

 

*श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर. पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.  ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे.*


*पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात. श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही. ती आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे. सात्विकता डोळ्यात भरुन येईल. भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते. मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.*


*१ प्रमुख - श्री काळभैरव.*

*२ उपप्रमुख - बटुकभैरव.*

*३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव.*

*४ अष्टभैरव - स्मशानभैरव.*

*५ नग्नभैरव.*

*६ मार्तण्डभैरव.*

*७ कपालभैरव.*

*८ चंडभैरव.*

*९ सन्हारभैरव.*

*१० क्रोधभैरव.*

*११ रुरुभैरव.*


*श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये. नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा. श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात. पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात. ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.


लेखक, संकलक अज्ञात। 


सोर्स व्हाट्सअप।

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात

एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 मुंबईदि.7 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य  संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य विषयी हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, 8 मार्च 2026 रोजी मुख्य सभागृहयशवंतराव चव्हाण सेंटरनरिमन पॅाईटमुंबई येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi