Sunday, 8 March 2026

2026-27 हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 यावर्षी आहे.

 त्यासाठी  एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी निधी देणार असून महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार आहे. तसेच  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येणार आहे. 75 गावांत ‘एआय’च्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार असून  महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करण्यात येईल. जानेवारी 2026 पर्यंत 1 कोटी 31 लाख फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार असून कृषी समृद्धी योजनेंतर्गत  2026-27 पासून 4 वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार आहे. तसेच  नवीन प्राकृतिक शेती अभियानात  5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्यात येईल.

अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

 अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

कर्जमाफीचा घोषणा

 

·         7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

·         शेतकरी कर्जमाफीनदीजोड प्रकल्पतिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

·         राज्याची विकसित महाराष्ट्रच्या दिशेने यशस्वी घौडदौड

·         एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार

 

मुंबई, दि. 6 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकासशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिकसामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला.

 

       विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यविधानसभा सदस्य उपस्थित होते

शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर भर

 शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेती उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयतंत्रज्ञानाचा वापर10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी आणि उत्पादन खर्चात 25 टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या ॲग्रीस्टॅक’ आणि महाविस्तार’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचा 30 लाख शेतकरी वापर करत असून ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

 पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी;

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 6 : महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने  सादर केला असून तो विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश

 राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश

 

2026-27 च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न 6,16,099 कोटी रुपयेतर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 40,552 कोटी रुपयांची महसुली तूट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीही राज्याची राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्यालाही

 राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्यालाही मोठा विस्तार देण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचेतसेच 6000 किलोमीटरपेक्षा अधिक द्रुतगती मार्गांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi