Sunday, 8 March 2026

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

 महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  एकल महिला धोरण राबवण्यात येणार असून त्यासाठी  सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणण्यात येईल. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांनाही अर्थसंकल्पात चालना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू ठेवण्यात येणार असून महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी १३ जिल्ह्यांत उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. राज्यात आतापर्यंत 3लाख लखपती दीदी’ तयार झाल्या असून पुढील काळात आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य

 नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य

राज्यातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 94,968 कोटी रुपयेतर दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी 13,497 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे सिंचनक्षमता वाढण्यासोबतच पाणीटंचाई असलेल्या भागांना मोठा दिलासा मिळेलअशी अपेक्षा आहे.

याशिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

शेती क्षेत्र अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित

 शेती क्षेत्र अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅकमहावेधक्रॉपसॅपमहाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्रणालींच्या माध्यमातून एकात्मिक डिजिटल कृषी व्यवस्था उभारली जाणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवोपक्रम केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यामुळे शेती उत्पादन खर्चात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.

नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

 नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

       राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम सुरु करणार असून  मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेमध्ये  प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देण्यात येणार आहे,त्याचा  20,594 मासेमारांना लाभ मिळेल.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु राहणार असून यासाठी  यंदा सुमारे 20,000 कोटींची तरतूद असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये 16 हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट असून, यातून 100 टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा तसेच डिसेंबर 2026 पर्यंत 10 हजार मे.वॅ. क्षमता स्थापित होणार आहे. सध्या  3349 मे.वॅ. क्षमता स्थापित आहे.तर  मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत आतापर्यंत 6,63,324 सौर कृषीपंप दिले असून सौर कृषीपंप  अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार

  अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून राज्य शासन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारणार असून  अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नव्यापिढीला महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी,

 जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील घर आणि जन्मस्थानाचे जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्यात येणार आहे. नव्यापिढीला महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी, त्यांचे  जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  रामटेक विकास आराखडा टप्पा-2 ची कामे करणार असून पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेणार असून 5 ज्योर्तिलिंग विकासाची कामे सुरु असून महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

2026-27 हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 यावर्षी आहे.

 त्यासाठी  एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी निधी देणार असून महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार आहे. तसेच  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येणार आहे. 75 गावांत ‘एआय’च्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार असून  महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Featured post

Lakshvedhi