Sunday, 8 March 2026

2026-27 हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 यावर्षी आहे.

 त्यासाठी  एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी निधी देणार असून महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार आहे. तसेच  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येणार आहे. 75 गावांत ‘एआय’च्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार असून  महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करण्यात येईल. जानेवारी 2026 पर्यंत 1 कोटी 31 लाख फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार असून कृषी समृद्धी योजनेंतर्गत  2026-27 पासून 4 वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार आहे. तसेच  नवीन प्राकृतिक शेती अभियानात  5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्यात येईल.

अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

 अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

कर्जमाफीचा घोषणा

 

·         7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

·         शेतकरी कर्जमाफीनदीजोड प्रकल्पतिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

·         राज्याची विकसित महाराष्ट्रच्या दिशेने यशस्वी घौडदौड

·         एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार

 

मुंबई, दि. 6 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकासशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिकसामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला.

 

       विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यविधानसभा सदस्य उपस्थित होते.

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

 फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

       मुंबई, दि.7 :  फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने 6 मार्च 2026 रोजी हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. मुंबईत येणाऱ्या विविध देशाचे राष्ट्राध्यक्षपंतप्रधान यांच्या स्वागत प्रसंगी सांस्कृतिक सुस्वागतम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

            सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने महादुर्गामहाकाली व महा सरस्वती दर्शवणारा "जोगवा" हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच "नमन" मधील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पात्र दर्शवण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमात  अविभाज्य अंग असणारी "पंढरीची वारी" हा सांस्कृतिक कार्यक्रम फिनलंडचे अध्यक्ष डॉ.अलेक्झांडर स्टब यांच्यासमोर सादर करण्यात आला.  या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य  विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी  यांचे

व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

 व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू

आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईदि. 7 : आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने  भारतीय नागरिकपर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतातअसे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे.

           आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना सहाय्य व अधिक माहितीसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावाअशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या  राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या( SEOC )वतीने देण्यात आली आहे.

पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 

मुंबईदि. : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरापश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिलादिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखलेज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. 

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशनलोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरातउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व श्रीमती स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.

संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

            मुंबईदि.7 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या लोकप्रिय गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 8 मार्च2026रोजी रात्री 8:15 वाजता यशवंत नाट्यमंदिरमाटुंगामुंबई येथे संपन्न होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून राना चॅटर्जीसरीता राजेशसन्नी सिंगसंगीता मेलेकर यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे समन्वय योर इंडीयन मेलोडीज ही करत आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा आस्वाद सर्वांनी घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे  यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi