Friday, 6 March 2026

लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजना करणार

 लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजना करणार


- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि.५ : लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले.

             ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा - कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा घटनांवर नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत लक्षवेधी विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडली.

             परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजाच्या रेल्वे सुरू करण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील लोकल रेल्वेतील वाढत्या गर्दीवरील उपाययोजनेबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मेट्रोंची संख्या वाढवणे.जास्तीत जास्त बसेस सुरू करून रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महिला व दिव्यांगासाठी राखीव डब्या प्रमाणेच परीक्षा काळात विद्यार्थ्यांना प्रवासात प्राधान्य देण्याबाबतही विचार करू असेही परिवहन मंत्री यांनी सांगितले.

म्हाडाच्या सेवा शुल्क थकबाकीप्रश्नी अधिवेशनानंतर बैठक

 म्हाडाच्या सेवा शुल्क थकबाकीप्रश्नी अधिवेशनानंतर बैठक

 

-         मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई,दि.5 : मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सेवा शुल्क थकबाकीच्या प्रश्नावर अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईलतसेच 56 वसाहतींमधील पुनर्विकासासाठी रिक्त केलेल्या आणि सध्या वास्तव्यास असलेल्या इमारतींचा स्वतंत्र आढावा घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाईल,असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

 

मंत्री शंभूराज देसाई म्हणालेयापूर्वी लागू केलेल्या अभय योजनेतून सेवा शुल्कावर सवलत देण्यात आली होती आणि त्यासाठी शासनाने सुमारे 450 कोटी रुपये म्हाडाला परतफेड केली होती. या प्रश्नावर निर्णय होईपर्यंत वसुलीच्या नोटिसा देणे तात्पुरते थांबवण्याचे निर्देश म्हाडाला दिले जातील.

 

पुन्हा अभय योजना लागू करायची असल्यास वित्त विभागाची संमती आवश्यक असल्याचे सांगूनथकबाकीदारांना हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा देण्याचा निर्णय म्हाडा घेऊ शकतोअसे मंत्री देसाई यांना सांगितले.

ऐनवाडी येथे नववी-दहावीचे वर्ग चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार

 ऐनवाडी  येथे नववी-दहावीचे वर्ग चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि.५ : ऐनवाडी येथील शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ दिले जातील,  असे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधीचे उत्तर देतांना सांगितले.

कोल्हापूर जिल्हातील शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी-धनगरवाडी हा डोंगराळ व दुर्गम भाग असून येथे आठवी पर्यंतच शिक्षणाची सोय आहे. शैक्षणीक सुविधांसंदर्भात लक्षवेधी विधानसभा सदस्य डॉ. विनय कोरे यांनी उपस्थित केली.

मंत्री शंभूराज देसाई यांनी  सांगितले कीडोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी जावे लागू नयेतसेच पावसाळ्यातील अडचणी व सुरक्षेच्या प्रश्नांचा विचार करून पटसंख्या कमी असली तरी अशा भागांत जवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात येतील.

डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी सर्व जिल्हा परिषदांमार्फत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात येणार असून या बाबींचा समावेश नवीन समग्र शिक्षण धोरणात करण्याचा विचार असल्याचेही मंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार

 विधानसभा कामकाज/ लक्षवेधी

 

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी गैरव्यवहाराची चौकशी  करुन दोषींवर कारवाई करणार

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

 

मुंबईदि.५ : केज (जि. बीड) नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी सुमारे ३.६२ कोटी रुपयांच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल. गरज भासल्यास या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटीनेमण्याचाही विचार केला जाईलअसे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

केज (जि. बीड) नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी सुमारे ३.६२ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात लक्षवेधी सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी मांडली. या चर्चेत सदस्य हरिष पिंपळेसुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीकेजमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३७४ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. केंद्र सरकारचा २ कोटी २४ लाख ४० हजार रुपये आणि राज्य सरकारचा ३ कोटी ६२ लाख रुपये असा एकूण ५ कोटी ८६ लाख ४० हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यात जमा करण्यात आला. योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचे आदेश असतानाही ग्रामीण बँकेत खाते उघडण्यात आले. त्यातून ११६ लाभार्थ्यांना सुमारे १ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये वितरित करण्यात आलेपरंतु उर्वरित सुमारे ४ कोटी २८ लाख २५ हजार रुपये लाभार्थ्यांना न देता इतरत्र वितरित झाल्याचे आढळून आले. या व्यवहारासंबंधी कोणतेही लेखेव्हाउचर्स किंवा स्पष्ट बँक स्टेटमेंट उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी लेखापालाकडून अहवाल मागवून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी समितीही गठीत केली आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी करून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी नमूद केले.

00000

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश

 जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश

 

मुंबईदि. ५ : जळगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्रातील अनियमितता व गैरकारभाराबाबत सुधारित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्यास उत्तर देताना मंत्री भरणे बोलत होते.

 

कृषी मंत्री भरणे म्हणाले, कृषी विज्ञान केंद्रातील दोन ट्रॅक्टर स्वतःच्या शेतात वापरणेकार्यालयीन साहित्याची खरेदी स्वतःच्या नावावरील दुकानातून दाखवणे तसेच मास्कआयपॅड आदी वस्तूंची बनावट खरेदी दाखवून आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आले आहेत. या अनुषंगाने सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आले आहेत.

 

तसेचकृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक यांना तातडीने निलंबित करण्याबाबत विद्यापीठाला सूचना देण्यात आल्या असून सुधारित अहवालानुसार आवश्यक असल्यास पुढील कारवाईसह गुन्हे दाखल केले जातीलअसे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

१०मार्च पर्यंत मुदतवाढनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार

 शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी

 १०मार्च पर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि.  - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.7 वी) 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता नियमित शुल्कासह 6 मार्च, 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता  30 डिसेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र / शुल्क भरणा करण्याकरीता वाढीव मुदत मिळण्यासाठी परीक्षा परिषदेस अनेक शाळांकडून विनंती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह  मार्च आणि अतिविलंब शुल्कासह १० मार्च पर्यंत ही मुदत असेल.

       सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिलेल्या मुदतीत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावीअसे आवाहन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

हनुमान गढी परिसर विकास

 असा आहे विकास आराखडा

 

हनुमान गढी परिसर विकास करताना 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर विविध विकासकामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याठिकाणी अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडपॲम्फीथिएटरयज्ञशाळाफूड मॉलक्राफ्ट सेंटर ,आखाडामहाप्रसाद हॉलबहुउद्देशीय सभागृहप्रशासकीय इमारतहनुमान गॅलरीदिव्यांग स्नेही रस्तापावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची व्यवस्था राहणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात संरक्षण भिंतअंतर्गत रस्तेमुख्य प्रवेशद्वारहनुमान मूर्तीवर लेझर शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

000

निलेश तायडे/विसंअ


Featured post

Lakshvedhi