Friday, 6 March 2026

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ॲड. शेलार यांनी सांगितले कीमहिला दिन केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. समाजाने आपल्या घरातकुटुंबात आणि परिसरात महिलांची प्रतिभा आणि क्षमता ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी संधी द्यावीअसे आवाहन त्यांनी केले.

महिलांचे हक्कसमानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या संकल्पनेचा उल्लेख करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.

.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात

 मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महायज्ञ ठरले असून येथे प्रत्येकाला आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे.

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज

 महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार


महिला कला महोत्सव २०२६ चे उद्घाटन


मुंबई, दि. ५ : महिलांच्या कला, सृजनशीलता आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून महिलांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले.


मुंबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेले कायदे केंद्र शासनाचे

 मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेअन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेले कायदे केंद्र शासनाचे आहेत. या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करुन खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे घातक रंग आणि त्यातील घटक यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रधानमंत्री यांना राज्य शासनाच्या वतीने पत्र पाठवून विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने खाद्य रंगांबाबतचे धोरण ठरविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा करण्यात येईल. राज्य शासनाच्या वतीने सर्व हॉटेल्सना खाद्यपदार्थांच्या मेन्युमध्ये त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत कळविण्यात आलेले आहेत्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरविणार

 खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील

 घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरविणार

-         अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. ५ : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांमध्ये असलेल्या घातक घटकांबाबत चर्चा करुन खाद्यरंगांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीस विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना विनंती करण्यात येईलअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले.

            सदस्य महेश शिंदे यांनी खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाणारे घातक कृत्रिम रंग वापरले जात असल्याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. सदस्य विक्रम पाचपुतेसुधीर मुनगंटीवारप्रवीण दटकेराजेश पवारहिरामन खोसकर यांनी सहभाग घेतला.

पाणंद रस्त्यांना गती

 पाणंद रस्त्यांना गती

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेअंतर्गत मंजूर कामांना गती देण्यात येईल. मजुरांना न्याय मिळावाकोणावरही अन्याय होऊ नये आणि मंजूर कामे पूर्णत्वास जावीतयासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य हिरामण खोसकरराजेश पवार आदींनी सहभाग घेतला.

ग्रामरोजगार सेवकांचे मानधन

 ग्रामरोजगार सेवकांचे मानधन

ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन देण्यासाठी नव्या लेखाशीर्ष उघडण्यात आले असून निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या मानधनासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित मानधन अधिवेशन संपण्यापूर्वी देण्याचा प्रयत्न राहील. तसेच कुशल मजुरांचे पैसेही लवकरच पूर्णपणे देण्यात येईलअसे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi