Thursday, 5 March 2026

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

 मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

 

मुंबई, दि.४ :ससून डॉक येथील मच्छिमारमहिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असूनया परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईलअशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

 

मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे  मंत्री नितेश राणे यांनी घेतला. यावेळी मच्छिमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

 

ससून डॉक येथे मत्स्य व्यावसायिक आणि विशेषतः महिला कामगारांसाठी शासनाने बांधलेले विश्रामगृह तातडीने खुले करावेअसे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

 

             बोटधारक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

 

 मासे उतरवणेसाठवणूक आणि विक्री या साखळीत मच्छिमारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेतयासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.

 

या बैठकीला आमदार राजेश राठोडमत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीसंबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००


 

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

 गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

 

मुंबई,  दि. ४ : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात 'गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थे'च्या प्रलंबित विषयांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.

बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले कीप्रवाशांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.सध्या वापरात असलेल्या जुन्या बोटींच्या जागी अत्याधुनिक आणि सुरक्षित 'अपग्रेडेडबोटी आणण्याच्या सूचना त्यांनी संस्थेला दिल्या.

 संस्थेच्या सध्या ९० बोटी कार्यरत आहेत. या बोटींचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करून नवीन आणि 'ॲडव्हान्सबोटी खरेदी करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी  संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले.

नवीन बोटी खरेदी करण्यासाठी संस्थेला आर्थिक अडचण येऊ नयेयासाठी संस्थेच्या सदस्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले. जलवाहतूक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा मिळावीयासाठी तांत्रिक बाबींवर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रवाशांना चांगली सेवा आणि सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदममहाराष्ट्र सागरी मंडळाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान महिला कला महोत्सव २०२६

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान  

महिला कला महोत्सव २०२६

मुंबई, दि. ५  महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ५ ते  ८ मार्च  दरम्यान महिला कला महोत्सव २०२६  या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. नृत्यनाट्यसंगीतमुलाखतीछायाचित्र प्रदर्शन तसेच महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री अशा विविध कलाप्रकारांची समृद्ध मेजवानी या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहे.

५ मार्च रोजी सायं. ६ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सायं.  ७ वाजता महाभारतात अभिमन्यूच्या वीरगतीनंतर अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची झालेली मनोवस्था दर्शवणारी नृत्यनाटिका उत्तरा सादर होणार असून याचे संकल्पना आणि दिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे असून, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांचे या नृत्यनाटिकेसाठी विशेष योगदान लाभले आहे. या नृत्यनाटिकेसाठी सादर होत असलेल्या काही रचनांना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. या नृत्यनाटिकेचे संगीत प्रणव हरिदास यांचे असून, लेखन मुग्धा गोडबोले, काव्य शिवप्रिया सुर्वे यांनी केलेले आहे. यात शरयू नृत्य कलामंदिरच्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. रात्री ८ वाजता मृणालिनी नानिवडेकरसंपादक मल्टीमीडियापुढारी माध्यम समूह यांची ‘ माध्यमप्रमुख ती ( फिल्ड पत्रकारिता ते माध्यमातील बॉस : एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास) ही  मुलाखत सुप्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक घेणार आहेत.

जुनी चिखलवाडीतील रहिवाशांना शिंदेच्या विनंतीवरून मिळणार रंगीत टीव्ही

 जुनी चिखलवाडीतील रहिवाशांना शिंदेच्या विनंतीवरून मिळणार रंगीत टीव्ही

जुनी चिखलवडीमधील रहिवाशांना नवीन घरे मिळाल्यामुळे त्यांचे गृह स्वप्न पूर्ण झालेच आहे. पण नवीन घरची चावी द्यायला मी आल्याने त्यांना घरासह एखादी भेटवस्तू मिळायला हवी अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी विकासाकडे व्यक्त केली. तसेच नवीन घरासह त्यांना एक टीव्ही देखील द्या अशी आग्रही मागणीच त्यांनी विकासक सतीश चतुर्वेदी यांना केली. अखेर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मान राखून चतुर्वेदी यांनी प्रत्येक रहिवाशाला घरासोबतच २४ इंची कलर टीव्ही भेट म्हणून देऊ असे सांगितले.


मुंबईतील नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेवमध्ये उभारणार

 मुंबईतील नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेवमध्ये उभारणार

गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आपण अनेक पथदर्शी निर्णय घेतले असून नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अंतर्गत नोकरदारकामगारमहिलाज्येष्ठ नागरिकमुंबईचे डबेवाले यांनाही सवलतीच्या दरात घरे देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुंबईत काम करण्यासाठी येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेव येथे उभारण्याला मंजुरी दिली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.


स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न

 स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतेते स्वप्न आज जुन्या चिखलवाडीतील रहिवाशांचे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिलीत्या अंतर्गत देण्यात आलेल्या इन्सेटिव्हचा लाभ रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळेच १२० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता ५८५ स्क्वेअर फुटांचे मोठे असे २ बीएचके घरे देणे शक्य झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी अतिशय उत्तम घरे विकासकाने दिलेली असूनविक्रीयोग्य घरांच्या एवढीच उत्तम घरे स्थानिक रहिवाशांनाही दिलेली असल्याचे सांगितले. याठिकाणी जिमलायब्ररीलग्नाचा हॉल अशा अनेक सुखसोयी देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील ४० लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सेस इमारतींप्रमाणे नॉन सेस इमारतींचे क्लस्टर उभारण्याचा देखील प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येईल. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेल्या पुनर्विकासाला आम्ही चालना दिली असून १७ हजार घरांचा प्रकल्प तिथे साकारला जात आहे. हा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवला जात आहेतर ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प ठाणे मनपा आणि सिडकोच्या माध्यमातून राबवला जात आहे. याशिवाय मुंबईतील जे प्रकल्प विकासकांनी अर्धवट सोडून दिलेत ते पूर्ण करण्यासाठी म्हाडाएसआरएबीएमसीएमएमआरडीएएमएसआरडीसीमहाप्रीत अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे.

जनतेला वेळेत घरे देणाऱ्या विकासकाला फुले तर लोकांना नाडणाऱ्या विकासकाला नारळ देण्यात मी मागेपुढे पाहत नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच अशा क्लस्टर योजनांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

कोरोना काळात विकासकाना संजीवनी देण्यासाठी ५० टक्के प्रिमियम कमी करण्याचा आणि स्टॅम्प ड्युटी मध्येही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईतील विकासकांना आणि घरे घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची आठवण करून दिली.

२५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

 २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

·         ताडदेवमध्ये मुंबईत येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह उभारणार

 

मुंबईदि.४ : मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

गेली २५ वर्षे जुन्या चिखलवाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या काळात ३६ विकासकांनी हा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ३७ वे विकासक म्हणून आलेल्या श्रीपती डेव्हलपर आणि आमदार पराग शहा यांनी मिळून हा प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केला. अवघ्या दोन वर्षात या इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे २६५ रहिवाशांना घर देणे शक्य झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज काही रहिवाशांना प्रतिकात्मकरित्या या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi