Thursday, 5 March 2026

नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना

 जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची 112 पदे मंजूर असून 34 रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 87 पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत. नव्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून रिक्त पदे लवकरच भरली जातील. नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक मातेला सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसृती सुविधा

 आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यापालघर जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) प्रसूतीवेळी डॉक्टर गैरहजर असल्याच्या घटनेची दखल घेत संबंधित आरोग्य अधिकारी निलंबित करण्यात आले असून दोन कंत्राटी डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक मातेला सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसृती सुविधा मिळावी यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुर्गम भागांमध्येही गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर आहे.

राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करण्यात आली असून कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित तपासली जाते. केंद्र सरकारच्या NAQOS (एनएक्यूओएस) ॲपद्वारे आठ निकषांवर पीएचसीग्रामीण रुग्णालये व इतर रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी केली जाते. तसेच लेबर रूम तपासणी कार्यक्रम आणि कायाकल्प अंतर्गत स्वच्छता व गुणवत्ता मानके काटेकोरपणे राबवली जात आहेत.

पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

 पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 मुंबईदि.२६ : पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उद्भवलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यापालघर जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) प्रसूतीवेळी डॉक्टर गैरहजर असल्याच्या घटनेची दखल घेत संबंधित आरोग्य अधिकारी निलंबित करण्यात आले असून दोन कंत्राटी डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक मातेला सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसृती सुविधा मिळावी यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुर्गम भागांमध्येही गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर आहे.

सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत

 सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण केली जात असून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनात आमूलाग्र बदल करण्यासाठी 'जीपीआर २.०हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून त्याचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असून महाराष्ट्राच्या प्रगतीची गाडी सुसाट सुटली आहेअसे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आम्ही केले असून विकासाची यात्रा आता थांबणार नाहीअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे

 सत्यनारायणाचा प्रसाद : एक आध्यात्मिक अर्थ

✍🏻 लेखक – अ‍ॅड. विकास एस. भाले

सत्यनारायण पूजेनंतर दिला जाणारा शिरा / गव्हाचा-रव्याचा प्रसाद हा केवळ गोड पदार्थ नसतो; तो जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक असतो.

१️⃣ “प्रसाद” शब्दाचा अर्थ

“प्रसाद” म्हणजे कृपा, शांतता, निर्मळता.

Bhagavad Gita मध्ये भगवान सांगतात:

“प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।” (२.६५)

मन प्रसन्न झाले की दुःख नष्ट होते.

म्हणून प्रसाद म्हणजे बाह्य गोडवा नव्हे, तर अंतर्मनाची प्रसन्न अवस्था.

२️⃣ सत्यनारायणाच्या प्रसादातील घटकांचे गूढ

🌾 गहू / रवा

गहू म्हणजे पृथ्वी तत्व.

तो सांगतो – जीवनात स्थैर्य आणि श्रम आवश्यक आहेत.

🧈 तूप

तूप म्हणजे संस्कारांची शुद्धता.

जसे तूप आगीवर वितळते, तसे अहंकार साधनेने वितळतो.

🍯 साखर / गूळ

जीवनातील कटुता गोड करण्याची भावना.

🍌 केळी / फळ

कर्मफळाचे प्रतीक – जे पेरतो तेच उगवते.

३️⃣ प्रसाद वाटण्यामागील संदेश

प्रसाद स्वतःपुरता ठेवत नाहीत – तो सर्वांना वाटतात.

याचा अर्थ:

✔ आनंद एकट्याचा नसावा

✔ संपत्ती सामायिक करावी

✔ ईश्वरकृपा सर्वांसाठी आहे

Mundaka Upanishad मध्ये म्हटले आहे –

“सत्येन लभ्यः” – सत्यानेच परमात्मा प्राप्त होतो.

प्रसाद वाटणे म्हणजे सत्य आणि प्रेम वाटणे.

४️⃣ प्रसाद आणि कर्मयोग

Bhagavad Gita मध्ये “यज्ञशिष्टाशिनः सन्तो” (३.१३) असे सांगितले आहे –

यज्ञातून उरलेले अन्न पवित्र असते.

सत्यनारायण पूजा म्हणजे एक यज्ञ आहे.

त्या यज्ञातून मिळालेला प्रसाद म्हणजे –

👉 “कर्म पूर्ण करून अहंकाररहित स्वीकार.”

५️⃣ प्रसाद न घेण्याचे तत्त्वज्ञान

कथेमध्ये जेव्हा प्रसादाचा अपमान केला जातो, तेव्हा संकट येते.

याचा अर्थ –

जो जीवनातील अनुभव (कर्मफळ) स्वीकारत नाही, तो दुःखी होतो.

प्रसाद स्वीकारणे म्हणजे:

✔ नियती स्वीकारणे

✔ ईश्वरावर विश्वास ठेवणे

✔ कृतज्ञता व्यक्त करणे

🌺 निष्कर्ष

सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे

जीवनातील प्रत्येक गोड-तुरट अनुभवाला ईश्वरकृपा मानून शांततेने स्वीकारण्याची वृत्ती.

तो हातात घेताना मनात एक प्रार्थना असावी:

“हे नारायण, माझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा तुझा प्रसाद समजून स्वीकारण्याची शक्ती दे.”

राज्यातील तरुणांच्या रोजगाराबाबत घोषणा

 राज्यातील तरुणांच्या रोजगाराबाबत घोषणा करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की२०२६ हे वर्ष 'भरती वर्षम्हणून राबवले जाणार आहे. यापूर्वी ७५ हजार रिक्तपदांची मोहीम राबवून आतापर्यंत १ लाख ५३ हजार पदांपैकी ८५ हजार ३६३ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण केली जात असून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनात आमूलाग्र बदल करण्यासाठी 'जीपीआर २.०हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून त्याचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असून महाराष्ट्राच्या प्रगतीची गाडी सुसाट सुटली आहेअसे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आम्ही केले असून विकासाची यात्रा आता थांबणार नाहीअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केवळ मुंबई-पुण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता

 केवळ मुंबई-पुण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींचीतर अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटींची गुंतवणूक येत आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी असून ते भविष्यातील ईव्ही उत्पादनाचे मोठे केंद्र असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi