Thursday, 5 March 2026

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबईदि. २६: मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे१०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदममुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीपोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकीचार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनलजीपीएस यंत्रणाव्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.


मराठीचा वापर वाढवू या!

 मराठीचा वापर वाढवू या!

 उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी  हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असतेविशालसामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली.

महाराष्ट्रात येणारा कोणतीही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवते आणि सोबत घेऊन जाते. तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे.

 

त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..

        मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार

        मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे

        आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे

        दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर

ही अत्यावश्यक पावले आहेत.

 

दिवंगत कवीवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी मराठीच्या सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे

 

मराठीची प्रतिभाज्ञानेश्वरीत सामावते

ग्रामगीता गाथाहीमराठीतच मावते

लावणीतून मराठीचेसौंदर्य ओसंडते

शौर्य आणि औदार्यपोवाड्यातून सांडते

मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले

गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले

अमृताशी पैज जिंकतेमराठी बोली

आभाळाची उंची जिच्यातसमुद्राची खोली

साऱ्यांनी मराठी हुंकारावर डोलावे

मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!

चला… मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूयामराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलूया..!

००००

विविध उपभाषांचा समृद्ध वारसा

 विविध उपभाषांचा समृद्ध वारसा

महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथमहानुभाव आणि वारकरी संत परंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिक व्यापक केले. आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे...तुम्हाला माहिती आहेश्री. चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदासशूद्रक यांच्या शाकुंतलमृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोली भाषेत आहेत.

 

वऱ्हाडीअहिराणीकोकणीमालवणीकोल्हापुरीमराठवाडीनागपुरीझाडीबोलीखानदेशीगोंडीबंजाराकोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.

 

जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होतेतशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवाविस्तार आणि ऊर्जा दिली आहे.

 

उदाहरणार्थवऱ्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता’ मध्ये वऱ्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे.तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वऱ्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो.आचार्य प्र.के.अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वऱ्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.

 

कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जाताततर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.

 

उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थकोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. अक्का’ हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड-तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वऱ्हाडीमध्येझाडीबोलीत हिंदीचेतर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आहेस्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची!

 

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास

 

उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धकअभ्यासकसंशोधकलेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

भाषाविषयक स्पर्धापरिसंवादव्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्राचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. मराठीचा प्रशासनिकशैक्षणिक आणि सामाजिक वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.

 

शासन प्रयत्नशील आहेचपरंतु सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विविध बोलीभाषांचा अभ्यास करून त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. भाषेचे संवर्धन हे केवळ धोरणातून नाहीतर व्यवहारातून होते.

पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार

 पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार

मुख्यमंत्री म्हणाले कीमहानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोतही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये  एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलताधर्मपरायणताकार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभारकायदा सुव्यवस्थेवर असेलली पकडत्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडीत्यांनी तयार केलेले कारखानेलघुउद्योगत्यांनी निर्माण केलेले मंदिरेघाटया सर्व कामातून  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी  आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण  घेतो कारण त्यांच्यासारखे जे  उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या  कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.

म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतीलअसे मुख्यमंत्री म्हणाले

दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारीअधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईलअसे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता9

 मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता

अहिल्यादेवी होळकर असे करणार

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•           गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य

       मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

        महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

 

मुंबई, दि. 26 : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने  गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहेही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.

 

राज्यात आतापर्यंत 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट

 महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्याराज्यात आतापर्यंत 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून राज्यात एकूण 1.10 लाखांपेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत. दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले असून त्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. स्मार्ट किट देताना संबंधित अंगणवाडीची इमारत ही शासनाच्या स्वमालकीची असणे बंधनकारक आहे.

 

स्मार्ट किटसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दरवर्षी दिले जातात. शासनाच्या आर्थिक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जातेअसे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi