पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार
मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.
म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले
No comments:
Post a Comment