Wednesday, 4 March 2026

महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा

 महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योगव्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जा मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेतयासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महापारेषणच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवरजेएसडब्ल्यूआवाडासीमेन्स आदी उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महापारेषणशी संबंधित 13 पैकी 9 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा तपशीलवार आढावा यावेळी घेण्यात आला. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून आवश्यक ते प्रशासकीय निर्णय तातडीने घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सद्यस्थितीत उमेद मार्टवर ४२०० पेक्षा जास्त उत्पादने

 सद्यस्थितीत उमेद मार्टवर ४२०० पेक्षा जास्त उत्पादने

       सद्यस्थितीत उमेद मार्ट वर ४२०० पेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे देशभरातील किंवा जगभरातील शहरी ग्राहकांना ग्रामीण बाजाची आणि अस्सल चवीची उत्पादने  स्वतःच्या घरात बसून उपलब्ध होण्याची सोय झालेली आहे. उमेद मार्टची सुरुवात होऊन उणीपुरी दोन वर्ष होत आहेत. या पोर्टलची सुरुवात केल्यानंतर उत्पादने अपलोड करणेदर्जेदार पॅकेजिंगवाजवी किंमतीची निश्चिती करणे या बाबी ग्रामीण भागातील महिलांना सहज करता याव्यात यासाठी राज्यभर प्रशिक्षणे देण्यात आली असून हा उपक्रम देशभर पोहचत आहे. देशभरातून आणि जगाच्या काही प्रमुख शहरातून ग्रामीण महिलांची उत्पादने मागविली जात आहेत.

उमेद मार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

 उमेद मार्ट  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

       उमेद अभियानाकडून राज्यभरातील स्वयंसहायता गटाच्या महिलांना रोजगार मिळावात्या उद्योजिका व्हाव्यातयासाठी सातत्याने वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जातात. तालुका ते राज्यस्तरीय प्रदर्शन भरविणेतात्पुरते किंवा कायमस्वरूपी विक्री केंद्र उभे करणे यासारखे उपक्रम आयोजित केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून उमेद अभियानाने मागील वर्षी उमेद मार्ट हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यावर महिलांचे विविध उत्पादने अपलोड करण्यात आली.

उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’

 उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड

 

मुंबईदि. २६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पदार्थांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता उमेद मार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म (ई-मार्केट प्लेस) ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा असा स्कॉच अवॉर्ड  नुकताच घोषित झाला.

प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

 प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा व प्रशिक्षण विषयक धोरण तयार करण्यात आले आहे. अनेक विभागांचे सेवाप्रवेश नियम कालबाह्य झाले होतेते बदलण्यात आले आहेत. राज्यात ई एचआरएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकाविभागीय चौकशी आदी सर्व गोष्टी आता ऑनलाईन करण्यात येत आहेत. १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९६० पासून एकाच विषयावर काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रिकरण सुरू आहे. सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन आणि प्रशासन सुलभ करण्याचे काम सुरू आहे.

भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी खुदसे जितने की जिद है मेरीमुझे खुदको ही हराना है

मै भीड नहीं हू दुनिया कीमेरे अंदर भी जमाना है या कवितेच्या ओळी उद्धृत करून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम शासन करेल, असा निर्धार व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ४०० कोटी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ४०० कोटी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकासाठी यावर्षी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्ट्रक्चरलचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून प्रवेशद्वार इमारतीचे काम ९६ टक्के झाले आहे. स्मारकाचे काम लवकर पूर्ण केले जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवस्मारकाबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचा आढावा घेत मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले कीसर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्टेटस को’ ठेवण्याचे निर्देश आहेत. राज्य शासन सातत्याने पाठपुरावा करत आहे.

 

कर्करोग उपचारासाठी त्रिस्तरीय प्रणाली

 कर्करोग उपचारासाठी त्रिस्तरीय प्रणाली

राज्यात त्रिस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरवरील उपचाराची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi