Tuesday, 3 March 2026

नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

 नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

राज्यात पूर्णपणे बांधकाम झालेल्या नवीन आरोग्य संस्थांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व संस्था कार्यान्वित करण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत यापुढेही राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

 राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची तपासणी झालीत्यापैकी १० लाख ५ हजार ७०४ जणांना निदान व उपचार सुरू करण्यात आले. मधुमेहासाठी १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्या होऊन २ लाख ८८ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौखिकस्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्याही मोठ्या प्रमाणात पार पडल्या असून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

 कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

राज्यात १६,७६१ कुष्ठरुग्ण उपचाराधीन असून ४ लाख ४७ हजार २९६ सहवासितांची नोंदणी झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३ लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आणखी ४२,००१ जणांना अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहे.

क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

 क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

क्षयरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत राज्यात ३६,५०७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली असून १ लाख ५७ हजार ९०४ रुग्ण उपचाराधीन आहेत. यापैकी १ लाख १२ हजार ८३८ रुग्णांची संमती घेऊन ३७,५८७ अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.

मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

 मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी २९ हायरिस्क प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८४,७३२ LLIN लाँग लास्टींग इनसेक्टीसायड नेट (एलएलआयएन) मच्छरदाण्यांचे वितरण करण्यात आले. यात आश्रमशाळांसाठी १२,२१७ तर हायरिस्क क्षेत्रासाठी ७२,५१५ मच्छरदाण्यांचा समावेश आहे. आयसीएमआर - एनआयएमआरच्या सहकार्याने सहा संशोधन प्रकल्पही राबविण्यात येत आहेत.

हत्तीरोग शस्त्रक्रिया व सार्वत्रिक औषधोपचार मोहीम pl share

 हत्तीरोग शस्त्रक्रिया व सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

हत्तीरोग (अंडवृद्धी) निर्मूलनासाठी ९९३ पात्र रुग्णांपैकी जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ६०१ रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. यात गडचिरोली येथे २१६ तर चंद्रपूर येथे १३० शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत (एमडीए) ३३ लाख २२ हजार ६७९ पात्र लोकसंख्येपैकी २९ लाख ४१ हजार ५५४ जणांनी औषधसेवन केले असून एकूण कव्हरेज ८८.५३ टक्के इतके झाले आहे.

गरोदर मातांना आयव्ही आयर्न उपचार

 गरोदर मातांना आयव्ही आयर्न उपचार

तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांसाठी १ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष उपचार मोहीम राबविण्यात आली. ५,२३१ मातांमध्ये तीव्र रक्तक्षय निश्चित करण्यात आला असून त्यापैकी ४,५८० मातांना इंजेक्शन आयर्न सुक्रोज व फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले आहेत.

Featured post

Lakshvedhi