Tuesday, 3 March 2026

‘उमेद' अभियानांतर्गत वाशी येथील आयोजित राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनात ५.५० कोटींची उलाढाल

 उमेदअभियानांतर्गत वाशी येथील आयोजित

राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनात ५.५० कोटींची उलाढाल

·         ७० महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग२६७ टन शेतमालाची थेट विक्री

 

मुंबईदि.२:  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'उमेद' - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात सुमारे ५.५० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली असूनमहिला शेतकरी कंपन्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात 'उमेद'ला उल्लेखनीय यश आले आहे.

या खरेदीदार-विक्रेता संमेलनामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील परस्पर खरेदी-विक्रीलाही मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. 'उमेद'च्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याचे आश्वासक चित्र पाहायला मिळत आहे.

थेट बाजारपेठ आणि अधिक नफा

राज्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पिकवलेल्या मालाला मध्यस्थांशिवाय थेट बाजारपेठ मिळावी आणि महिला शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव व अधिक नफा मिळावाहा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या व्यासपीठामुळे पहिल्यांदाच ७० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नामांकित खरेदीदार समोरासमोर आले.


परदेशात वास्तव्यास असलेल्या म संपर्क क्रमांक

 परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावाअधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावाअसे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवूनमहाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.


संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in, कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in, सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in,  इस्रायल (तेल अवीव) येथे  फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in, इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९,  संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in,  कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in, बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in, जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : eoibaghdad.gov.in तसेच ई-मेल  : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in   नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.


याशिवाय मुंबई जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२२-२२६६४२३२ / ०८६५७१०६२७३ आणि पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२२६२३०५४ / ०२२-२२६२५०२० आदी पर्याय संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

परदेशात वास्तव्यास असलेल्या म: ००-९६६-५४२१२६७४८टोल फ्री : ८००-२४७-१२३४ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in,  इस्रायल (तेल अवीव) येथे  फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.inइराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९,  संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in,  कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६ई-मेल : community.kuwait@mea.gov.inबहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०ई-मेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.inजॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९वेबसाईट : eoibaghdad.gov.in तसेच ई-मेल  : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in   नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.

याशिवाय मुंबई जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२२-२२६६४२३२ / ०८६५७१०६२७३ आणि पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२२६२३०५४ / ०२२-२२६२५०२० आदी पर्याय संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज pl share

 मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना

मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षपोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मुंबईदि. 2 : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह)कतार (दोहा)सौदी अरेबिया (रियाध)इस्रायल (तेल अवीव)इराण (तेहरान)इराक (बगदाद)कुवेतबहारीनमस्कतजॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावेअनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावेअसे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असूनदूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

सर्वेक्षण भारतातील पहिले विकेंद्रीकृत, एआय आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल

 उद्योजक/ आस्थापना नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वय वर्षे 18-40 च्या उमेदवारांची नोंदणीकरिता स्वतंत्र पोर्टल/ वेबसाईट निर्माण करण्यात येईल. ज्याद्वारे या योजनेची माहिती संपूर्ण उद्योजक, प्रशिक्षण संस्था, उमेदवारांना प्राप्त होईल. कौशल्य प्रशिक्षणाच्या आधारे उमेदवाराना रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यात येईल.

हे सर्वेक्षण भारतातील पहिले विकेंद्रीकृत, एआय आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल उभारत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल आणि यामधून एक अभिनव, स्वायत्त एआय मॉडेल विकसित केले जाईल. हे स्थानिक पातळीवरील कौशल्य, रोजगार आणि धोरणात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन बुद्धिमत्ता संरचना निर्माण करेल.

 

या योजनेला जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर यांच्यामार्फत अनुदान दिले जाईल. तर जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर ही कार्यान्वयीन यंत्रणा असेल. या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एच पश्चिम वार्ड मुंबई उपनगर येथील दरवर्षी पाच हजार प्रमाणे 2027 पर्यंत 15 हजार उमेदवारांचे विविध कौशल्य प्रशिक्षण योजनेतर्गत कौशल्य वृद्धी करुन रोजगार/ स्वयंरोजगार प्राप्त करुन देण्यात येईल. सर्वेक्षण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच करण्यात येत आहे.

उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे

 उपलब्ध असलेले अधिकृत कौशल्य प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे नजीकच्या अंतरावर उपलब्ध करुन घेण्यात येईल. उमेदवाराने कौशल्य प्रशिक्षणाकरिता दाखविलेल्या कलानुसार संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात येऊन याठिकाणी उमेदवारांना अभ्यासक्रमनिहाय प्रशिक्षण देण्यात येईल.

उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे नजीकच्या उद्योजक/ आस्थापना येथे उमेदवारांना प्रशिक्षण संस्थेद्वारे रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल.

उद्योजक/ आस्थापना नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वय वर्षे 18-40 च्या उमेदवारांची नोंदणीकरिता स्वतंत्र पोर्टल/ वेबसाईट निर्माण करण्यात येईल. ज्याद्वारे या योजनेची माहिती संपूर्ण उद्योजक, प्रशिक्षण संस्था, उमेदवारांना प्राप्त होईल. कौशल्य प्रशिक्षणाच्या आधारे उमेदवाराना रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यात येईल.

सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी

 सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी

 सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचा उद्देश हा 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचा कल (interest) लक्षात घेऊन संबंधित उमेदवारांना प्रशिक्षणाअंती रोजगारक्षम बनविणे हा आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सापिओ ॲनालायटीक या संस्थेद्वारे एच पश्चिम वार्डातील जवळपास 55 हजार घरी भेट आणि एआय आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक घरातील उमेदवारांची विहित नमुन्यामध्ये माहिती जमा करण्यात येईल.

विशेषत: 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचे शिक्षण व रोजगार मिळवण्याकरीता आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करण्याचा कल जाणून घेण्यात येईल. संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येईल व त्या अनुषंगाने उमेदवारांचा कौशल्य प्राप्त करून घेण्याचा कल  नोंदविण्यात येईल.

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेच्या ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे

 सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेच्या सक्षम युवकसक्षम राज्य’ या लोगोचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उद्योजकांसमवेत प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम विभागीय कौशल्य स्पर्धेतील (राष्ट्रीयस्तर) विजेत्या विध्यार्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या वतीने सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी आभार मानले

Featured post

Lakshvedhi