Tuesday, 3 March 2026

युवकांना मुंबईत विविध क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगून त्यांचा कल जाणून प्रशिक्षण

 जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी युवकांना मुंबईत विविध क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगून त्यांचा कल जाणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले तर ते रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढील दोन ते तीन महिन्यात राबविण्यात येणारे सर्वेक्षण, युवकांच्या कलानुसार प्रशिक्षण आणि रोजगार अथवा स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन या तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल देशातील या पहिल्या सर्वेक्षण योजनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागाबरोबरच उद्योग, कामगार, महानगरपालिका, बचतगट, विविध क्षेत्रातील उद्योजक यांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांचा कल विचारात घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने महाविद्यालये, नागरिक आणि युवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले.


युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी

 पालकमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने 18 ते 40 वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल. या सर्वेक्षणानंतर 2027 पर्यंत सुमारे 15 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड शेलार यांनी केले.

मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे 55 हजार घरांतील युवकांचा कौशल्य

 मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे 55 हजार घरांतील युवकांचा कौशल्य क्षमता कल जाणून घेण्यासाठी सुरू होत असलेल्या सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या योजनेच्या उद्घाटन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधीजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह कौशल्य विकास उपायुक्त आनंद माळी, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे विभागीय संचालक सी.एस. मूर्तीकौशल्य विकास विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन जाधव, सहायक आयुक्त शैलेश भगत, नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य नेहा जगतियानी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागातील अधिकारी, उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते

चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत

 चांद्यापासून बांद्यापर्यंतगावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानकेत्यांचा परिसरबसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असूनपुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‍ सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत.सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशाप्रकारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.


 

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये...

 जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये...

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ३ :  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हेतर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

             एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरसहा.कामगार आयुक्त पल्लवी सहारेतसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

          मंत्री सरनाईक म्हणाले एसटी महामंडळाची २५१ आगारे आणि ६१० पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके राज्यभर आहेत. सुमारे १२ हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या १ कोटींपर्यंत जाईल. अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच

नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

 नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

राज्यात पूर्णपणे बांधकाम झालेल्या नवीन आरोग्य संस्थांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व संस्था कार्यान्वित करण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत यापुढेही राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

 राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची तपासणी झालीत्यापैकी १० लाख ५ हजार ७०४ जणांना निदान व उपचार सुरू करण्यात आले. मधुमेहासाठी १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्या होऊन २ लाख ८८ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौखिकस्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्याही मोठ्या प्रमाणात पार पडल्या असून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Featured post

Lakshvedhi