Monday, 2 March 2026

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टीडीआर देण्याबाबतच्या प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी करू

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टीडीआर देण्याबाबतच्या

 प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी करू

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. २८: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत टीडीआर देण्याबाबतच्या प्रक्रियेतील अनियमिततेबाबत विधिमंडळ सदस्यांकडून विशिष्ट प्रकरणी तक्रार व माहिती प्राप्त झाल्यास या प्रकरणाची चौकशी केली जाईलअसे नगरविकास  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी  विधान परिषदेत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील  नगररचना विभागातील टीडीआर प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितलेटीडीआर देण्याचे अधिकार हे आयुक्त किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडेच असतात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये १२ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व २४ उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ही पदे मंजूर आहेत.  तसेच त्यांना बांधकाम मंजुरी अथवा टीडीआर मंजुरीचे कोणतेही अधिकार महापालिकेतर्फे प्रदान केले नसल्याने त्यांच्याकडून ११० बांधकामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी उत्तरात सांगितले.

भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना सुरू

 भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना सुरू

– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. 28 : मुंबईसह राज्यभरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना राबविल्या जात असून शाळा व मैदानांभोवती संरक्षण भिंती (कंपाउंड) पूर्ण करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिसरात कचरा साठू नयेयासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश देण्यात आले आहेतअशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदेप्रवीण दरेकरज.मो.अभ्यंकर यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळा परिसरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता राज्यमंत्री मिसाळ यांनी माहिती दिली.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या कीभटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात  दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणीत काही निर्देश दिले होते. त्यानुसार श्वानांचे स्थलांतर केंद्रांमध्ये करणे तसेच स्वायत्त संस्थांच्या अखत्यारितील शैक्षणिक संस्थामैदानेरुग्णालये आदी ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित संस्थांच्या दर्शनी भागावर नोडल अधिकाऱ्याचे नाव लावण्याचेही निर्देश होते.

महानगरपालिकेकडून शाळा-महाविद्यालयांना भटक्या श्वानांबाबत कोणतेही काम सोपविण्याचा लेखी अथवा तोंडी आदेश देण्यात आलेला नाही.  तथापिशाळांमधील शिक्षकांना फक्त श्वानदंश झाल्यास विद्यार्थ्यांनी कोणती प्राथमिक खबरदारी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या जनजागृती संदर्भातील सूचनेनुसार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भटक्या श्वानांचा प्रश्न हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि कायदेशीर मार्गानेच या समस्येवर उपाययोजना केल्या जातीलअसेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रकियेची फेरचौकशी

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारीकर्मचाऱ्यांच्या

पदोन्नती प्रकियेची फेरचौकशी

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 28 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2010 पासून आजपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांचा आधारे वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली नाही. तथापि विधानपरिषद सदस्यांनी केलेली मागणी  लक्षात घेऊन शासनाकडून सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीचा अहवाल  लवकर मागवण्यात येईलअशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधान परिषद सदस्य अमित गोरखेप्रवीण दरेकरसंजय खोडके या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला असता राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले कीकोणतीही पदोन्नती सेवा प्रवेश नियमांच्या बाहेर झालेली नाहीत्याचप्रमाणे उपलब्ध अहवालात नियमबाह्य पदोन्नतीचा एकही प्रकार आढळून आलेला नाही.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले कीपदोन्नतीचे सर्व प्रस्ताव यापूर्वी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआसीटीईआणि विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसीयांच्या नियमांनुसार तपासण्यात आले होते. त्याचप्रमाणे दूरस्थ पद्धतीने प्राप्त पदव्या नियमबाह्य मानून हे प्रस्ताव अस्वीकारही करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या कीमहाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांच्या पदव्या राज्यात स्वीकारता येणार नाहीत. मात्रमहाराष्ट्रातील एआयसीटीई व यूजीसी मान्यताप्राप्त आणि संलग्न (अॅफिलिएटेड) विद्यापीठांच्या पदव्या नियमांनुसार ग्राह्य धरल्या जातील.

या प्रकरणी शासनाकडून चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित केली जाईलअसेही राज्यमंत्री मिसाळ यांनी शेवटी सांगितले.

000

भारतनगर परिसराचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करणार

 भारतनगर परिसराचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करणार

-मंत्री शंभराज देसाई

 

मुंबई, दि. २८ : वांद्रे पूर्व येथील भारतनगर परिसराचा विकास करण्याबाबत शासनाची कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात येतील. तसेच सर्वेक्षणानंतर म्हाडा अथवा झोपटपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यापैकी कोणत्या यंत्रणेमार्फत विकास करायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य मुरजी पटेल यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, भारतनगर येथील मूळ जागा म्हाडाच्या ताब्यात असून येथील क्षेत्र ४० एकर पेक्षा अधिक आहे. या ठिकाणी म्हाडामार्फत रहिवाशांना वितरीत केलेल्या जागेबरोबरच काही अतिक्रमणधारक तसेच काही झोपडीधारक आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन विगतवारी होणे गरजेचे आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्या परिसराच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार

 मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार

-मंत्री शंभराज देसाई

 

मुंबई, दि. २८ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अब आझमी, अमित साटम, मुरजी पटेल, अनंत नर, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.


पुण्यातील विनापरवाना फेरीवाल्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देणार

 पुण्यातील विनापरवाना फेरीवाल्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे

आदेश देणार

- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि. २८ : पुण्यातील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ज्या फेरीवाल्यांकडे परवाना नाही अशांबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना तातडीने देण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

 

पुण्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे होणारी वाहूतक कोंडी याबाबत सदस्य बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य राहूल कुलप्रशांत बंबभीमराव तपकीर यांनी सहभाग घेतला.

 

वीज वितरण यंत्रणा सक्षम व बळकट करण्यासाठी महापारेषण कंपनीतर्फे भोसरी येथील सेंचुरी एन्का अतिउच्चदाब केंद्रामध्ये

 भोसरी मतदारसंघांमध्ये वाढत्या वीज ग्राहकसंख्येचा तसेच भविष्यातील वीज मागणीचा विचार करता वीज वितरण यंत्रणा सक्षम व बळकट करण्यासाठी महापारेषण कंपनीतर्फे भोसरी येथील सेंचुरी एन्का अतिउच्चदाब केंद्रामध्ये ५० एम.व्ही.ए. ची दोन उच्चदाब रोहित्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच२२० के. व्ही. टेल्को उपकेंद्राची क्षमता वाढवण्याचे नियोजन २०२७-२८ वर्षाच्या त्याचप्रमाणेमोशी सफारी पार्क आणि प्राईड वर्ल्ड सिटीचहोली येथे नवीन २२०/३३/२२ के.व्ही.२०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचे नियोजन २०२९-३० वर्षाच्या (एसटीयू प्लॅनआराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

 

२२० के. व्ही. चिंचवड उपकेंद्राला अधिक क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी२२० के.व्ही. उर्स-चिंचवड वाहिनीच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी  बदलण्याचे काम ७.१२.२०२५ रोजी पूर्ण झाल्यामुळे वाहिनीची वीज वहन क्षमता दुप्पट झाली आहे. २२० के. व्ही. चाकण-भोसरी वाहिनीच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी बदलण्याचे काम सुरु असूनसदर काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. ४०० के. व्ही. लोणीकंद उपकेंद्र ते २२० के. व्ही. भोसरी उपकेंद्र व २२० के. व्ही. चिंचवड उपकेंद्र ते २२० के. व्ही. भोसरी उपकेंद्र दरम्यान असणा-या २२० के. व्ही. द्विदल वाहिन्यांच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी बदलण्याच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi