Sunday, 1 March 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा

 

देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

-         महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. 1 : राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिलाविद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावेअसे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख संचालक यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली.

महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात 7 आणि 14 मार्च, 10 आणि 17 एप्रिल तसेच 8 आणि 15 मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

राऊळगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेवर शोक प्रकट

 राऊळगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेवर शोक प्रकट

 

मुंबईदि. १:- नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.

याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारीपोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफएसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. पेसो’ आणि डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावीअशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

0000

 

सौदी अरेबियाच्या राज्यातभारतीय दूतावासाचे २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे: 00-966-11-4884697, 00-966-542126748 (फक्त व्हॉट्सअ‍ॅप), 800 247 1234 (टोल-फ्री), ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

 रियाध

सौदी अरेबियाच्या राज्यात सध्या वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचासौदी अरेबियामध्ये प्रचलित असलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचा तसेच स्थानिक प्रशासन आणि दूतावासाकडून जारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 रियाध येथील भारतीय दूतावास आणि जेद्दा येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत आणि आवश्यकतेनुसार पुढील अद्यतने व सल्ले जारी करतील.

रियाध येथील भारतीय दूतावासाचे २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे: 00-966-11-488469700-966-542126748 (फक्त व्हॉट्सअ‍ॅप), 800 247 1234 (टोल-फ्री), ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना आपत्कालीन संपर्क तपशील पुढीलप्रमाणे +989128109115 +989128109109,

 तेहरान

इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचाअनावश्यक हालचाली टाळण्याचा आणि शक्य तितक्या घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय नागरिकांनी बातम्यांवर लक्ष ठेवावेपरिस्थितीचीबाबत जागरुक रहावे. भारतीय दूतावासाकडून येणाऱ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.

दूतावासाचे आपत्कालीन संपर्क तपशील पुढीलप्रमाणे +989128109115
+989128109109,

दोहा -कतारमधील सर्व भारतीय नागरिकांनाआपत्कालीन परिस्थितीत, कृपया पुढील क्रमांक व ईमेलवर संपर्क साधावा: दूरध्वनी: +970592916418, ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

 दोहा

कतारमधील सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा तसेच दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या बातम्या व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. दूतावासाचा २४x७ हेल्पलाईन क्रमांक00974-55647502 असूनकोणत्याही चौकशीसाठी ईमेल: cons.doha@mea.gov.in वर संपर्क साधावा.

स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचनेनुसारसार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लष्करी स्थळांच्या परिसरापासून दूर राहावे आणि घरात किंवा इतर कोणत्याही इमारतीत सुरक्षित राहावे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये किंवा हालचाल करू नयेजेणेकरून कोणत्याही जोखमीपासून बचाव होईल.

प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरपॅलेस्टाइनमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची तसेच स्थानिक प्रशासनाकडून सूचित करण्यात आलेल्या सुरक्षा व आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतकृपया पुढील क्रमांक व ईमेलवर संपर्क साधावा:
दूरध्वनी
: +970592916418, ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

अबू धाबी येथील भारतीय दूतावासभारतीय नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सअ‍ॅप: +971543090571, ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in

 अबू धाबी येथील भारतीय दूतावास आणि दुबई येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन चौकशीसाठी यूएईमधील भारतीय नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सअ‍ॅप: +971543090571ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in

तेल aviv सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांनाआपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नागरिकांनी तेल अवीव येथील भारतीय दूतावासाशी पुढील २४x७ हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा: दूरध्वनी: +972-54-7520711; +972-54-2428378, ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.in

 तेल अवीव

 सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरइस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सर्व वेळ सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी इस्रायली अधिकाऱ्यांकडून आणि होम फ्रंट कमांडकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेअसा कडक सल्ला देण्यात आला असून अद्ययावत सूचना खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
https://www.oref.org.il/eng सर्व भारतीय नागरिकांनी नियुक्त आश्रयस्थळांच्या जवळ राहावे तसेच आपल्या निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील संरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील सर्व अनावश्यक व गैर-आवश्यक प्रवास टाळावाअसा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांनी स्थानिक बातम्याअधिकृत घोषणा आणि आपत्कालीन इशारे यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतभारतीय नागरिकांनी तेल अवीव येथील भारतीय दूतावासाशी पुढील २४x७ हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा: दूरध्वनी: +972-54-7520711; +972-54-2428378, ई-मेल: cons1.telaviv@mea.gov

Featured post

Lakshvedhi