मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ' लेटर ऑफ इन्टेंट' देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 1 March 2026
कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी
कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॅनेडियन शिष्टमंडळसाठी स्वागत कार्यक्रम
मुंबई, दि. १ : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती
देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती
मुंबई, दि. 28 :- भारताच्या ‘नारी शक्ती’ला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका असून संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गौरवोद्गगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी काढले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीदवारे उपस्थित होते. यावेळी 'वर्षा' निवासस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ अशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.
माध्यम प्रतिनिधींना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी दोन सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधान भवन प्रांगणात लोकार्पण
माध्यम प्रतिनिधींना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी दोन सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
विधान भवन प्रांगणात लोकार्पण
मुंबई, दि. 28 :- समाज आणि देशाच्या व्यापक हितासाठी पत्रकार सातत्याने संवेदनशील, आव्हानात्मक आणि अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करत असतात. नैसर्गिक आपत्ती, अपघात, दंगली किंवा इतर संवेदनशील भागात वार्तांकन करताना कधी कधी तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते. अशा प्रसंगी त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी समर्पित रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मात्र कोणत्याही पत्रकार अथवा प्रतिनिधींवर ही रुग्णवाहिका वापरण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधान भवन प्रांगणात महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी दोन सुसज्ज ॲम्बुलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आर बी जी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या रुग्णवाहिका केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर गरज पडल्यास इतर रुग्णांनाही उपयोगी पडतील. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल. समाजासाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दैनंदिन घडामोडींचे वार्तांकन करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर बी जी फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने या ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी असोसिएशनचे महासचिव पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनश्री पाठक, मनाली गायकवाड, राजेश साफळे, अनिल सौंदडे तसेच विधान भवनातील मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेस आणि आरोग्य संरक्षणास बळकटी मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन · भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन
· भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने "महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ०१ मार्च, २०२६ रोजी दु. १२:०० वाजता, भूमिपुत्र भवन, उलवे, नवी मुंबई येथे होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत स्त्री ही शक्ती, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. महिला लोककलांमध्ये विविध लोकगीत आणि नृत्याचे प्रकार आहेत, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्यशैलींचा समावेश असतो. महिलांच्या या कला, कौशल्ये आणि सामाजिक स्थानाला योग्य महत्त्व देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता नृत्य, गीत, नाटिका आणि विविध सादरीकरणांद्वारे स्त्रीशक्तीचा जागर मांडला जाईल. या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नवी मुंबई परिसरातील कलाप्रेमींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य
मुंबई, दि. २८ : दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री (टूलकिट) खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. पूर्वी या योजनेद्वारे एक हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे, याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिकल कामे, सुतारकाम, वाहन दुरुस्ती, किरकोळ व्यवसाय इत्यादी सुरू करण्यास इच्छुक असतात; मात्र आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात. महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र, २०४७ या कृती आराखड्यातील दिव्यांग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग या पार्श्वभूमीवर ही योजना कार्यान्वित केली आहे.
ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू असून प्रशिक्षित दिव्यांग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येत असून निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे. निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येईल.
शासनाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे. तसेच, ही योजना दिव्यांग व्यक्तींना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनास चालना देणारी ठरणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या https://divyangsahayakportal.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान
मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उद्घाटन झाले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून लोकभवन येथे स्वच्छता व वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाचे कार्य केले जात असल्याबद्दल राममूर्ती यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे कौतुक केले तसेच भविष्यात देखील स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले. जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आजच्या स्वच्छता अभियानात जवळपास 200 श्री सदस्यांनी भाग घेतला.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...