Saturday, 28 February 2026

नागपूर येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर

 नागपूर येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई  करणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबईदि. २७ : मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीनागपूर या संस्थेच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईलअसे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीनागपूर या संस्थेच्या सार्वजनिक जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की,  संबंधित सहायक निबंधकांनी चौकशी करुनचौकशी अहवालसंस्थेचा खुलासाअभिप्राय व निष्कर्षासह सादर केला आहे.

संस्थेने हस्तांतरित केलेल्या सात भूखंडांबाबत चाचणी लेखापरीक्षण करण्यात येईल व लेखापरीक्षण अहवालाअंती दोषी आढळून आल्यास सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

तसेच या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या संबंधित सहायक निबंधकसहकारी संस्था यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल.

या चर्चेत विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार आणि प्रविण दटके यांनीही सहभाग घेतला.

अंधेरी पश्चिम ते अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या अंधेरी सबवे व्यतिरिक्त गोखले ब्रिज

 अंधेरी पश्चिम ते अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या अंधेरी सबवे व्यतिरिक्त गोखले ब्रिज मुख्य रस्ता आहे. गोखले ब्रिजच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. अति पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद ठेवल्यास एस.व्ही. रोडवरील वाहतूक गोखले ब्रिजवर वळविण्यात येते. त्यामुळे अंधेरी पश्चिमेला वाहतूक कोंडीची समस्या होत नाही. मात्र ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला तर इथे पाणी साचू नये म्हणून  १९७ कोटीचे काम प्रस्तावित आहे. या प्रश्नाबाबत सर्व विभागांची बैठक घेऊन यातून मार्ग काढणार असल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अमित साटमदिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.

मुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग

 राज्यमंत्री माधुरी  मिसाळ म्हणाल्या कीमुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग हा एक पर्यायी मार्ग आहे. अंधेरी भुयारी मार्ग हा भौगोलिकदृष्ट्या खोलगट भाग आहे. या भुयारी मार्गावर पश्चिम उपनगरीय रेल्वे जाते. यामुळे भुयारी मार्गाच्या खोलीकरण किंवा रुंदीकरणासाठी भौगोलिक अडचणी आहेत. जर पावसाचे प्रमाण १९ मि.मी. प्रति तास पेक्षा जास्त झाल्यास या भुयारी मार्गात पाणी साचते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य व जलवाहिनी खात्यामार्फत पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार एकूण २२५० घन मीटर प्रति तास इतक्या क्षमतेने पाण्याचा निचरा करणारे तीन पंप बसविण्यात येतात.

मुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग हा एक पर्यायी मार्ग

 राज्यमंत्री माधुरी  मिसाळ म्हणाल्या कीमुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग हा एक पर्यायी मार्ग आहे. अंधेरी भुयारी मार्ग हा भौगोलिकदृष्ट्या खोलगट भाग आहे. या भुयारी मार्गावर पश्चिम उपनगरीय रेल्वे जाते. यामुळे भुयारी मार्गाच्या खोलीकरण किंवा रुंदीकरणासाठी भौगोलिक अडचणी आहेत. जर पावसाचे प्रमाण १९ मि.मी. प्रति तास पेक्षा जास्त झाल्यास या भुयारी मार्गात पाणी साचते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य व जलवाहिनी खात्यामार्फत पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार एकूण २२५० घन मीटर प्रति तास इतक्या क्षमतेने पाण्याचा निचरा करणारे तीन पंप बसविण्यात येतात.

Friday, 27 February 2026

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच जारी करणार

 कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी

शासन निर्णय लवकरच जारी करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई२७ : बायोटिक ग्रेडेबल नसलेले कुठलेही साहित्य वापरून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. या निर्णयाला अधिक स्पष्टता देण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल. तसेचअशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि अशा फुलांचा वापर करून सजावट करणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरील कारवाईचा समावेशही या शासन निर्णयात करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

            कृत्रिम फुले व प्लास्टिकच्या वस्तूंच्या उत्पादनविक्री व वापरासंदर्भात विधानसभेत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

अंधेरी सबवे वाहतूक कोडींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणार

 अंधेरी सबवे  वाहतूक कोडींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणार

                                               -राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. २७: अंधेरी सबवे मध्ये पावसाळ्यात पाणी साठते त्यामुळे येथे होणा-या वाहतूक कोंडीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना मुंबई महापालिका करत आहे असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

                  मुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिमला जोडणारा अंधेरी सबवे हा एकमेव मार्ग आहे. तेथे पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे अंधेरी सबवेबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य मुरजी पटेल यांनी विधानसभेत मांडली.  

         राज्यमंत्री माधुरी  मिसाळ म्हणाल्या कीमुंबई मधील अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग हा एक पर्यायी मार्ग आहे. अंधेरी भुयारी मार्ग हा भौगोलिकदृष्ट्या खोलगट भाग आहे. या भुयारी मार्गावर पश्चिम उपनगरीय रेल्वे जाते. यामुळे भुयारी मार्गाच्या खोलीकरण किंवा रुंदीकरणासाठी भौगोलिक अडचणी आहेत. जर पावसाचे प्रमाण १९ मि.मी. प्रति तास पेक्षा जास्त झाल्यास या भुयारी मार्गात पाणी साचते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य व जलवाहिनी खात्यामार्फत पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार एकूण २२५० घन मीटर प्रति तास इतक्या क्षमतेने पाण्याचा निचरा करणारे तीन पंप बसविण्यात येतात.

परभणी जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार

 परभणी जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि.२७ : परभणी जिल्हा बँके झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लवकरात लवकर करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत विधानसभा सदस्य हरिष पिंपळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजी नगर यांचे मार्फत चौकशी सुरू आहे.

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले कीपरभणी जिल्हा बँकेतील झालेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यास रिझर्व्ह बँकेला कळवून या बँकेची परवानगी रद्द केली जाईल. तसेच अनुकंपाच्या नावाखाली गैरप्रकार झाला असल्याच्या तक्रारी आहेतत्याची देखील चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य प्रकाश साळुंकेविजय वडेट्टीवारप्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi