Wednesday, 25 February 2026

पूर्वी रुग्णालये केवळ खर्च दाखवायची, पण प्रत्यक्ष सेवा देतात की नाही याची खात्री

 पूर्वी रुग्णालये केवळ खर्च दाखवायचीपण प्रत्यक्ष सेवा देतात की नाही याची खात्री नव्हती. आता निश्चित दर (रेट्स) शासनाने वाढवून दिले आहेत आणि त्या दरानुसारच रुग्णालयांना सेवा द्यावी लागेल. प्रत्येक रुग्णालयाने आपल्या बेडचा दर सार्वजनिकपणे घोषित करणे अनिवार्य असेल. तसेच रुग्णालयांनी त्यांच्या एकूण निधीपैकी २ टक्के रक्कम धर्मादाय सेवेसाठी वापरणे बंधनकारक आहे. मात्र आतापर्यंत या निधीचा अचूक वापर दिसून येत नव्हता. या अधिवेशनात कायद्यात सुधारणा करून हा  २ टक्के निधी डॅशबोर्डवर दिसेलज्यातून कोणत्या रुग्णावर किती खर्च झाला हे स्पष्ट होईल. या संदर्भातील काही मुद्दे  उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने विधी व न्याय विभागाला रुग्णालयांची बाजू ऐकून निर्णय घेण्याचे निर्देश दिले असूनशासनाचे मत स्पष्ट आहे कीसर्व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र व राज्याच्या आरोग्य योजना तसेच राखीव खाटा व निधी पारदर्शकपणे लागू कराव्यातअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.पहिल्यांदाच राज्य शासनाकडे प्रत्येक रुग्णालयाच्या बेडची अद्ययावत माहिती उपलब्ध आहे. पुढील दुरुस्ती नंतर ही प्रणाली अधिक सक्षम आणि पारदर्शक होईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            या प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालविधानसभा सदस्य विजय वड्डेटीवारआमिन पटेल,प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

00000

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक

 राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना

शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. २४ : राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

            आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीशासनाने धर्मादाय रुग्णालयांची नवीन सवलतीची व्याख्या तयार केली असून त्या अनुषंगाने अनेक रुग्णालये आता धर्मादाय श्रेणीत येतात. या रुग्णालयांनी गरीब व गरजू रुग्णांसाठी राखीव खाटा आणि निधीबाबत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा आणि रुग्णांवरील खर्चाची अचूक माहिती मिळावी म्हणून शासनाने डायनॅमिक डॅशबोर्ड तयार केला आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयातील खाटांची माहितीत्यावरील खर्चआणि धर्मादाय निधीचा उपयोग आदी माहिती कोणत्याही वेळेत पाहता येईल.

स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट

 आयोजित प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्टार्टअप्सइन्क्युबेटर्सगुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याची दृष्टी मांडली. ग्रामीण भागातील नाविन्यताइन्क्युबेशन नेटवर्क आणि परिणामाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी राबवत असलेल्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह तसेच प्रादेशिक स्टार्टअप संवादाच्या माध्यमातून नाशिकला नाविन्यता-आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

यावेळी नासिक-त्र्यंबकेश्वर कुंभ मेला प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील

 डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले कीग्रामीण भागातील विद्यार्थीनवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.

नाशिकमधील ३० हून अधिक उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या गोलमेज परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत पायाभूत सुविधाहवामान बदल अनुकूलनपाणी व कचरा व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक प्रणाली यावर चर्चा झाली. CSR आणि नाविन्यता-आधारित हस्तक्षेपांच्या माध्यमातून कुंभला जागतिक स्तरावरील लिव्हिंग लॅब म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

डॉ. पाटील यांच्या हस्ते सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन लॅब अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना पारितोषिक वितरण करण्यात आले. नाविन्यता-आधारित आणि प्रभावाभिमुख उद्योजकतेला चालना देण्याची नाविन्यता सोसायटी बांधिलकी त्यांनी पुनः अधोरेखित केली.

नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र म्हणून

 डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर नाविन्यता परिसंस्था मजबूत करण्याचा राज्याचा रोडमॅप मांडला आणि नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र स्टार्टअप धोरणांतर्गत नाविन्यात सोसायटी कल्पनेपासून विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना मार्गदर्शनसंस्थात्मक भागीदारीभांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वय यांद्वारे एकात्मिक सहाय्य प्रणाली उभारत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी रेअर अर्थ मेटल्स आणि महत्त्वपूर्ण खनिज मूल्यसाखळी यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सनी संशोधन व नाविन्यता-आधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.

डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले कीग्रामीण भागातील विद्यार्थीनवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.

गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

 गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

नाशिकदि.२५महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारीउद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीगुंतवणूकदारस्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पनाभागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

उद्घाटन सत्राला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसादCSRBOX चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह आणि Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या-तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नाविन्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार

 राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार

- मंत्री डॉ.अशोक वुईके

 

मुंबईदि. 24 : राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी व्यक्त केला. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

 

राणी दुर्गावती आदिवासी महिलासक्षमीकरण’ योजनेबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभगाचे सचिव विजय वाघमारेमहिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक नंदिनी आवडे तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) उपसंचालक श्वेता पालवेराज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi