Saturday, 21 February 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ­­‘कुंभदूत’ ॲपचे अनावरण · एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ­­‘कुंभदूत’ ॲपचे अनावरण

·         एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

नवी दिल्ली २० : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमधील 'महाराष्ट्र पॅव्हेलियन'ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत' या एआय-आधारित ॲपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले.

            या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने रु. 67 कोटी निधी मंजूर

 होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने रु. 67 कोटी निधी मंजूर

-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

 

मुंबई, दि. 20 - होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

`महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट, पालघर तसेच इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

19 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने राज्याच्या 13 कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारित 16 कोटी मनुष्यदिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाईल, असेही मंत्री गोगावले स्पष्ट केले.

एआय-आधारित विकासासाठी सर्वन एआय सोबत भागीदारी

 एआय-आधारित विकासासाठी सर्वन एआय सोबत भागीदारी

महाराष्ट्र शासन आणि सर्वन एआय यांच्यात सामंजस्याच्या पत्राचे (Letter of Intent) आदानप्रदान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रत्युष कुमार यांनी या कार्यक्रमास अध्यक्षस्थान भूषवले. महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी, व्यापक सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा उभारणे हा या सहकार्याचा उद्देश आहे.

या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्यक्ष वापरासाठी सक्षम अशी सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत रचना उभारण्यावर भर देण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, कृषी, कल्याणकारी योजना तसेच सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभावी वापर होण्यासाठी भक्कम पायाभरणी केली जाणार आहे. यासोबतच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला गती देण्यासह उदयोन्मुख एआय क्षेत्रांमध्ये मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. येत्या काळात 20 मेगावॅट क्षमतेची आणि भविष्यात 50 मेगावॅटपर्यंत विस्तारता येईल अशी एआय-सुसंगत संगणकीय क्षमता उभारण्याचे लक्ष आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या डिजिटल सार्वभौमत्वाला बळकटी देणारी असून, एआय-आधारित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, सर्वन एआय चे संस्थापक डॉ. प्रत्युष कुमार उपस्थित होते.

भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

 भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्यात आला. या भागिदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख एआय क्षेत्रात क्षमताबांधणी यावर भर दिला जाणार आहे.

भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

 भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्यात आला. या भागिदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख एआय क्षेत्रात क्षमताबांधणी यावर भर दिला जाणार आहे.

भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

 भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्यात आला. या भागिदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख एआय क्षेत्रात क्षमताबांधणी यावर भर दिला जाणार आहे.

 

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट

 इंडिया एआय इम्पॅक्ट समिट

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

 

नवी दिल्ली, 20 : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले. तसेच विविध मान्यवरांच्या भेटी,  बैठकांमध्ये सहभागी होत  सामंजस्य करार केले. याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले.

 

अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी!

ओपन एआयचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अझीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. ओपन एआय आणि रॉकेट लर्निंगशी भागिदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याचा लाखो अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे.

 

Featured post

Lakshvedhi