Tuesday, 17 February 2026

लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

 लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

इ.स. १६७५ मध्ये मुघलची सत्तेने श्री गुरु तेगबहादुर साहेबजी यांचा अनन्वित छळ केला त्यामध्ये ते शहीद झाले. त्या काळात भयावह वातावरण होतेकोणालाही गुरुजींच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी लखीशाह बंजाराजे एक नामांकित व्यापारी व कारवाँ प्रमुख होतेत्यांनी एकाच वेळी हजारो बैलगाड्या एकत्रित केल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुजींचे पवित्र शरीर आपल्या गाडीत लपवून दिल्लीतील रायसीना परिसरात नेले.एकाच वेळी आलेल्या हजारो बैलगाड्या त्यांनी उडालेला धुराळा यामुळे त्यांच्या मनातील पवित्र कार्य कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर आपल्या घराला आग लावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेजेणेकरून मुघल अधिकाऱ्यांना संशय येऊ नये. आजचे गुरुद्वारा रकाब गंज साहिब हे त्याच बलिदानाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे.या ठिकाणी एक भव्य सभागृह आजही त्यांच्या नावाने उभे आहे.या घटनेमुळे लखीशाह बंजारा हे शीख परंपरेत त्यागनिष्ठा आणि मानवतेचे प्रतीक ठरले आहेत.


मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज

 मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज

भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्ययुगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापारवाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हेतर धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो. शीख इतिहासातील लखीशाह (लाखा) बंजारा यांचे योगदान हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. श्री गुरु तेगबहादुर साहेब जी यांच्या शहीदीनंतर सेवातसेच त्या काळातील बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्यहे दोन्ही घटक शीख-बंजारा संबंधांचे सशक्त द्योतक आहेत.

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

 आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

 

मुंबई, दि.१६ : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले.  

 

पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.

 

त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

मानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय ) महत्त्वाची भूमिका

 जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर  म्हणाल्या कीमानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय ) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपण सर्वजण मिळून याचा योग्य वापर केलातर विज्ञानातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवणेआरोग्यशिक्षणउद्योग आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर करणे शक्य होईल.उद्योग क्षेत्रात  एआयमुळे मोठे बदल घडत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्था परस्पर सहकार्य करून नवीन संशोधन आणि नवकल्पना राबवत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असूनलाखो व्यावसायिक आणि तज्ज्ञ यामध्ये कार्यरत असल्याचे कॉफ्लर यांनी म्हटले.

विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर

 विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात कौशल्य विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही लोढा म्हणाले.

Monday, 16 February 2026

विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर

 विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात कौशल्य विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही लोढा म्हणाले.

छोट्या छोट्या उद्योगांच्या जोरावरच भारत

 मंत्री लोढा  म्हणाले कीप्राचीन भारतात आपल्या उद्योगात तत्कालीन प्रगत तंत्रज्ञान वापरात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. छोट्या छोट्या उद्योगांच्या जोरावरच भारत त्या काळी  एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगभरात व्यापार करत असे. स्वदेशीच्या संकल्पनेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत जगभरातल्या ७५ पेक्षा अधिक देशांना स्वदेशी लस देऊन वैश्विक मैत्रीची भूमिका घेतली. यावर ते थांबले नाहीत तर अधिक अद्ययावत तंत्रज्ञान भारतात आणून स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर्मनीच्या सहकार्याने सुरु होत असलेला ए आय  लिव्हिंग लॅब'   हे त्याचेच द्योतक असून स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले.

Featured post

Lakshvedhi