Tuesday, 17 February 2026

लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

 लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

इ.स. १६७५ मध्ये मुघलची सत्तेने श्री गुरु तेगबहादुर साहेबजी यांचा अनन्वित छळ केला त्यामध्ये ते शहीद झाले. त्या काळात भयावह वातावरण होतेकोणालाही गुरुजींच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी लखीशाह बंजाराजे एक नामांकित व्यापारी व कारवाँ प्रमुख होतेत्यांनी एकाच वेळी हजारो बैलगाड्या एकत्रित केल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुजींचे पवित्र शरीर आपल्या गाडीत लपवून दिल्लीतील रायसीना परिसरात नेले.एकाच वेळी आलेल्या हजारो बैलगाड्या त्यांनी उडालेला धुराळा यामुळे त्यांच्या मनातील पवित्र कार्य कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर आपल्या घराला आग लावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेजेणेकरून मुघल अधिकाऱ्यांना संशय येऊ नये. आजचे गुरुद्वारा रकाब गंज साहिब हे त्याच बलिदानाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे.या ठिकाणी एक भव्य सभागृह आजही त्यांच्या नावाने उभे आहे.या घटनेमुळे लखीशाह बंजारा हे शीख परंपरेत त्यागनिष्ठा आणि मानवतेचे प्रतीक ठरले आहेत.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi