Monday, 16 February 2026

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

 रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही


रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):- केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील 15 दिवस ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी दि.1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत 15 दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.

या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती 19 फेब्रुवारी (1 दिवस), होळी पौर्णिमा 2 मार्च (1 दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल (1 दिवस), ईद-ए-मिलाद 26 ऑगस्ट (1 दिवस), गणपती उत्सव 15 सप्टेंबर (दुसरा दिवस), 19 सप्टेंबर (गौरी विसर्जन), 25 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) 3 दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) 30 सप्टेंबर (1 दिवस), नवरात्री उत्सव 17 ते 20 ऑक्टोबर (4 दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) 8 नोव्हेंबर (1 दिवस), ख्रिसमस 25 डिसेंबर (1 दिवस),31 डिसेंबर – (1 दिवस).

दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 19 (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार

 स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोडप्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार

-  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

·         उद्योगांना उपयुक्त ठरणारी देशातील पहिली 'ए आय  लिव्हिंग लॅबमहाराष्ट्रात सुरु

·         महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री लोढा यांच्या हस्ते लॅबचा शुभारंभ

 

मुंबई दि. १६ : उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली 'ए आय  लिव्हिंग लॅब'' महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर  यांच्या उपस्थितीमध्ये या लॅबचे महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उदघाटन करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे.

जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लरराज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवालकौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माकुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरजर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉप हेलिरजीआयझेडचे संचालक उल्करे एबेलींगकौशल्य विकास आयुक्त अमित सैनीव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांच्या उपस्थित रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या  (आरटी-एमएसएसयू) सेंट्रल हॉल येथे लिव्हिंग लॅबशी संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले आहेत.

विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव

 विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव

            गेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅलीनिबंध स्पर्धाचित्रकला स्पर्धाआणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीशेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.

यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्सएचपीसीएलचे मुकुंद जवंजलआयओसीएलचे संतोष दैतगेल इंडियाचे मोहम्मद शफीमुख्य प्रबंधक दीपक वाघवरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारीइंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार

 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार

            १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य तेल आणि वायू वाचवाहरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणेपरकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

 ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

मंत्री भरत गोगावले

·         'सक्षम २०२५-२६अभियानाचा समारोप

 

            मुंबईदि. १६ : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजेअसे प्रतिपादन फलोत्पादनरोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलात्यावेळी ते बोलत होते.

मंत्री गोगावले म्हणाले कीवाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.

राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत

 पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

                                                                   

पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात

 पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, ‘आई’ पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi