विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव
गेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.
No comments:
Post a Comment