Monday, 16 February 2026

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 

मुंबईदि. १६ : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधीकौशल्यविकासडिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपमकक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे.

या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरयुनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटोआंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीतंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना

 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना

 

आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वंचित घटकांतील बालकांमध्ये अनुसूचित जाती (एससी)अनुसूचित जमाती (एसटी)विमुक्त जाती (अ)भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी)विशेष मागासवर्ग (एसबीसी)आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकएचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालकअनाथ बालकेदिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. तरआर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थाच्या ठिकाणापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा (हवाई अंतर) आरटीई पोर्टलवर दिसतील. या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी आदी सूचना शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत.

 

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीतअचूक माहिती भरण्यात यावीतसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करता येईलअसेही शिक्षण संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

  

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

१० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

 

मुंबईदि. १६:  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळाविना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी संबंधित अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि.१६ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महवीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृहवांद्रे पश्चिममुंबई येथे  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

भारताचे पहिले उपप्रधानमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाची आठवण करून देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीप्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दीतसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा

 मुंबई महानगर क्षेत्रात पॉड टॅक्सीसाठी महापालिकांनी आराखडा तयार करावा

                                            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

  • 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

मुंबईदि. १३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी पॉड टॅक्सी’ सेवा ‘एमएमआर’मधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटीदेण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावेअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

नंदनवन येथे झालेल्या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव नविन सोनाठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगलठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळआदी अधिकारी उपस्थित होते.

Convene to Chart "Blueprint for Women-Led Prosperity" at India AI Impact Summit 2026

 Convene to Chart "Blueprint for Women-Led Prosperity" at India AI Impact Summit 2026

National Commission for Women (NCW), International Telecommunications Union (ITU), and United Nations Institute for Training and Research (UNITAR) to host high-level consultation on "AI & Arthik Shakti" to shape the future of women’s economic agency

NEW DELHI, February 152026 – As the India AI Impact Summit 2026 kicks off at Bharat Mandapam, a strategic coalition comprising the National Commission for Women (NCW), United Nations Institute for Training and Research (UNITAR), and the International Telecommunication Union (ITU),  has announced a pivotal side event dedicated to the economic empowerment of women in the age of Artificial Intelligence.

Titled "AI & Arthik Shakti: A Blueprint for Women-Led Prosperity," the session is scheduled for February 16 at 3:30 PM (Room 9), Bharat Mandapam. This interactive dialogue will bring together policymakers, technologists, and creative artist to exchange critical insights and lay the foundation for an action-oriented blueprint—to be developed post-summit—that ensures women across India and the Global South are architects of the AI revolution, not just consumers.

Featured post

Lakshvedhi