Monday, 16 February 2026

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 

मुंबईदि. १६ : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधीकौशल्यविकासडिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपमकक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे.

या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरयुनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटोआंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीतंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi