Friday, 13 February 2026

मत्स्यव्यवसायात एआय तंत्रज्ञान; मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली 'मत्स्यवाणी' व्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉमबाबत चर्चा

 मत्स्यव्यवसायात एआय तंत्रज्ञान;

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली

'मत्स्यवाणीव्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉमबाबत चर्चा

 

मुंबईदि. १२ : मत्स्यव्यवसाय प्रशासनात आमूलाग्र सुधारणामहसूल वृद्धी आणि इंटेलिजन्स प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मत्स्यवाणी – एआय तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिला व्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म राबविण्याचा प्रस्ताव मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला.

 

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक परिणामकारकजलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येत आहे. मत्स्यवाणी प्लॅटफॉर्ममुळे शासकीय यंत्रणामच्छीमार व उद्योग यांच्यातील संवाद सुलभ होऊन महसूल वृद्धीसोबतच सशक्त शासकीय प्रणाली प्रस्थापित होईलअसे मंत्री राणे यांनी सांगितले.

 

बैठकीत मच्छीमार समुदायांसाठी जलसुरक्षा उपाययोजना अंतर्गत पर्यावरणीय जलजनक तंत्रज्ञानाचा (हवेतील आद्रतेपासून जल तयार करणे) पायलट प्रकल्प राबविण्याबाबतही चर्चा झाली. तसेच महाराष्ट्र एकात्मिक किनारीसीमा व जिल्हा वैज्ञानिक अंमलबजावणी व सुरक्षा अभियान या प्रस्तावावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तटीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपायांवरही बैठक झाली.

 

मंत्री राणे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकास आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

           

या बैठकीस मत्स्यआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीडवेल लाईफ सायन्स प्रा.लि.चे संचालक वैभव ढसाळ तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

  

आदिवासी विद्यार्थ्यांना टेकबीद्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

·        आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेक यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि. १२ : आदिवासी विद्यार्थ्यांना टेकबीद्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार टेकबी’ (अर्ली करिअर) कार्यक्रमाद्वारे बारावीनंतर थेट आयटी क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या करारावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील उपस्थित होत्या.

भारत संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 भारत संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्यायसमानताबंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरिसमधील त्यांच्या या स्मारकाला मंत्री शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे डॉ. सचिव किरण कुलकर्णीपुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्वीकारताना आज ऊर भरून आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री ॲड. शेलार यांनी आभार मानले आहेत. भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांनीही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचेही तमाम महाराष्ट्रातर्फे मंत्री ॲड.शेलार यांनी आभार मानले. तसेच हा महाराष्ट्रासाठीदेशासाठी शिवप्रेमींसाठी गौरवाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

·         युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

 

मुंबईदि. 12 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले.

यूनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मंत्री ॲड.शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजीयूनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिस येथे स्वीकारले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षणसुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याणयासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.

रायगडराजगडप्रतापगडपन्हाळाशिवनेरीलोहगडसाल्हेरसिंधुदुर्गसुवर्णदुर्गविजयदुर्गखांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह जागतिक वारसा स्थळ म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2025 मध्ये मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे.

बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे

 या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

 ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजेशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला- मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. सारथी संस्थेच्यावतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावेअशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळेवेळी दिल्या होत्या,अशी माहितीही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.        

स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती

 स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या

बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती

 

         मुंबई, दि.१२ : स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहितीउपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी "संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना" सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ व मुलीसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित ६२ शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

Featured post

Lakshvedhi