Wednesday, 11 February 2026

आरोग्य संपन्न गाव अभियान

 अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाजिल्हा व तालुका यंत्रणाप्राथमिक आरोग्य केंद्रउपकेंद्र  याठिकाणी कार्यरत आरोग्य अधिकारीआरोग्य सेवक-सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकनाच्या आधारे गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांना ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.

या अभियानाच्या अमंलबजावणी व संनियत्रणासाठी आरोग्य मंत्री यांच्या अध्यतेखाली राज्य आरोग्य संपन्न गाव संनियंत्रण समितीसह राज्यस्तरीय आरोग्य संपन्न गाव कृती समितीजिल्हास्तरीय आरोग्य संपन्न गाव अभियान समितीतालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय कृती समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायस्तरीय समिती गाव आरोग्य कृती आराखडा तयार करेल. त्यामध्ये आरोग्य सेवांची स्थितीअडचणीव सुधारणा उपायआरोग्य ग्रामसभास्वच्छता अभियानपोषण जागरूकतास्वमुल्यमापन चाचणीआरोग्य नकाशेकार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचा समावेश असेल. यासाठी गावांचे स्वमूल्यमापन ते राज्यस्तरीय अंतिम मुल्यमापन केले जाईल. यातून गावांना प्रथम कमांकासाठी जिल्हास्तरविभाग आणि राज्यस्तरासाठी अनुक्रमे पंचवीस लाखएक कोटी व पाच कोटींचे पुरस्कार असतील. दुसऱ्या क्रमांकासाठी वीस लाख७५ लाख आणि ३ कोटी तर तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख५० लाख आणि दोन कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. उपआरोग्य केंद्राला जिल्हास्तर प्रथम क्रमांकासाठी पाच लाखराज्यस्तरासाठी २५ लाखप्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी १० लाख व राज्यस्तरासाठी ५० लाख दिले जातील.

ग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावर ७५ लाखांचा पुरस्कार दिला जाईल. याशिवाय पंचायत समितीला राज्यस्तरावर अनुक्रमे २ कोटीदीड कोटी व एक कोटी पंचवीस लाखांचा पुरस्कार दिला जाईल. तर जिल्हा परिषदेला राज्यस्तरासाठी अनुक्रमे पाचतीन व दोन कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. त्यासाठी दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

गावातील नागरिकांना सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गांव’ अभियान

 गावातील नागरिकांना सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गांव’ अभियान सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानाच्या अंमलबजावणीत आरोग्य उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असतील. या अभियानातून सामाजिक बांधिलकीलोकसहभागलोककेंद्रीत नियोजन व शाश्वत आरोग्य व्यवस्थापनाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. या माध्यमातून आयुष्मान भारतराष्ट्रीय आरोगय अभियानपोषण अभियानस्वच्छ भारत अभियानसस्टनेबल डेव्हलपमेंट गोल्स-३ यांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार आहे.

Tuesday, 10 February 2026

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविणार ग्रामपंचायतींसाठी पाच ते २ कोटींचे पुरस्कार, आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर

 राज्यात माझं गावआरोग्य संपन्न गावअभियान राबविणार

ग्रामपंचायतींसाठी पाच ते २ कोटींचे पुरस्कारआरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर

राज्यात माझ गांवआरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दर आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंतच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येईल. अभियानात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंयातींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.

राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे व प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मुलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठीसंसर्ग व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करून त्यांचे निर्मूलन करणे आणि माता व बालकांचे आरोग्यमान उंचावणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांच्या जीवनशैलीतआहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहनप्रतिबंधात्मक उपाययोजनावेळेवर उपचार व पुनर्वसन हे चार स्तंभ असतील.

ओझर या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे विमानच भरारी

 ओझर या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे विमानच भरारी घेणार नाहीतर नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेणार आहे. दावोस दौऱ्यात नाशिकसाठी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.  त्यामुळे प्रत्यक्षअप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे  होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षितपणे पार पडला. त्या साठी साधू- संतमहंत यांचे सहकार्य लाभले होते. यावेळेसही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे सुरू आहेत.  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार कुठलीही कसर ठेवणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला विमान प्रवास करता

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला विमान प्रवास करता यावा यासाठी देशातील महत्वाच्या शहरात उड्डाण योजनेतंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यात नाशिकच्या विमानतळाचा समावेश होता. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता वाढणार आहे. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.

 

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी

 विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी

 

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकामासह

विस्तारीकरणाचे भूमीपूजन

 

            नाशिकदि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हेतर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईलअसा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन आज सायंकाळी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेअन्न व औषध प्रशासनविशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळखासदार भास्कर भगरेखासदार राजाभाऊ वाजे,

आमदार सीमा हिरेआमदार दिलीप बनकरआमदार सरोज अहिरेआमदार नितीन पवारमहापौर हिमगौरी आडकेउपमहापौर विलास शिंदेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामविशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेकुंभमेळा आयुक्त शेखर सिंहमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,

            महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितजिल्हाधिकारी आयुष प्रसादहिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदीजानोरीचे सरपंच सुभाष नेहरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि एचएएलचे संजय चौधरी यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले.

‘संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 ‘संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला

 २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. ९ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता आठवी वी ते पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत www.yuvacareer.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू राहीलअसे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

हे प्रशिक्षण महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीनागपूर व मुंबई यांच्या मार्फत मराठीइंग्रजी व हिंदी भाषांमध्ये दिले जात आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळपर्यंत www.yuvacareer.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहेत्यांना प्रशिक्षणाचे वेळापत्रक वेळेत पोहोचविण्यात येईल. तसेच प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य असल्याची व परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना घटनात्मक कायद्याचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र Certificate Course on Constitutional Law बार्टीपुणे यांच्या मार्फत दिले जाईल.

सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र www.yuvacareer.com या संकेतस्थळावरुन ९ फेब्रुवारी २०२६ पासून प्राप्त करण्याची प्रक्रिया पार पाडावी. तसेच संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ अंतर्गत प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर १ मार्च२०२६ रोजी (रविवार) प्रॉक्टरिंग पद्धतीने मॉक टेस्ट आयोजित करण्यात येईल. या मॉक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची संपूर्ण पद्धत समजावून दिली जाईल. या मॉक टेस्टचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पहिली परीक्षा रविवार, ८ मार्च२०२६ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा रविवार, १५ मार्च२०२६ रोजी आयोजित करण्यात येईल.

नोंदणी प्रक्रिया किंवा तांत्रिक बाबींविषयी अडचण येत असल्यास संबंधित विद्यार्थी अथवा संस्था यांनी यू-ट्यूब (Yuva Career Club) लिंकवर https://youtube.com/@yuvacareerclub??si=hSpntFIcScpPvRuU उपलब्ध असलेले ऑनलाईन प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शक व्हिडिओ अवश्य पाहावेत असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Featured post

Lakshvedhi