Tuesday, 10 February 2026

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत

 महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत

– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना

 

मुंबई, दि.9 : महिलांवरील अत्याचारछळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहेअसे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हा व तालुका तर शहरात झोन निहाय  समन्वय बैठका घेण्यात याव्यात अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. 

कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने

 मुंबई विभागीय मंडळाच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पत्रकार सभेत इ. 12 वीच्या 58 परीक्षा केंद्रांची माहिती कळविण्यात आली होती. तरी केंद्र संचालक, परीरक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्या सभा घेऊन त्यात त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित करण्यात आले. सद्यस्थितीत बहुतांश परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची  पूर्तता केल्यामुळे सदर परीक्षा केंद्रांच्या संख्येत बदल होऊन कॅमेरे उपलब्ध नसणारी केंद्र संख्या 58 वरुन 11 वर आलेली आहेअशी माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित

 मुंबई विभागीय मंडळाच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पत्रकार सभेत इ. 12 वीच्या 58 परीक्षा केंद्रांची माहिती कळविण्यात आली होती. तरी केंद्र संचालक, परीरक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्या सभा घेऊन त्यात त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित करण्यात आले. सद्यस्थितीत बहुतांश परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची  पूर्तता केल्यामुळे सदर परीक्षा केंद्रांच्या संख्येत बदल होऊन कॅमेरे उपलब्ध नसणारी केंद्र संख्या 58 वरुन 11 वर आलेली आहेअशी माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आली आहे.

०००००

परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

 परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक

मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

 

मुंबईदि. 9 : इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत कॅमेरे नसलेल्या केंद्रांची संख्या 58 वरुन 11 इतकी कमी झाली असल्याची माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक व सर्व कर्मचारी अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नियुक्त करण्यात येणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

 

ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले कीओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसागडकिल्लेविविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल. ओटीएममधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.

ओटीएम २०२६’; महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद आशियातील सर्वात मोठ्या ‘ओटीएम २०२६’ ट्रॅव्हल शो मध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग

 ‘ओटीएम २०२६’; महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आशियातील सर्वात मोठ्या ओटीएम २०२६’ ट्रॅव्हल शो मध्ये

महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग

 मुंबईदि. ९ : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेपर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे,महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.  दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद त्यांनी साधला

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही

 पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यासइतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशयपक्षपात किंवा अन्याय होऊ नयेयासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेतयासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi