परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक
मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
मुंबई, दि. 9 : इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत कॅमेरे नसलेल्या केंद्रांची संख्या 58 वरुन 11 इतकी कमी झाली असल्याची माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक व सर्व कर्मचारी अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नियुक्त करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment