Sunday, 8 February 2026

परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती § राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ

 परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती

§  राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ

 

 नवी दिल्ली, दि. ६ : भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असूनगेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १.५१२ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होतीहा आकडा २०२४ मध्ये वाढून ३.७०५ दशलक्षवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  दिली.

 

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसारमहाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १.५१२ दशलक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३.३८८ दशलक्षवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३.७०५ दशलक्ष इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे२०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असूनपर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.

 

जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनेपरदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीरोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची तत्परता

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची तत्परता

 

मुंबईदि.06 : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी सायं 5 वा. च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीसांनी तत्परता दाखविली.

 

अपघातानंतर बोरघाट पोलीस केंद्र यांनी रायगड परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारीखालापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक महसूल प्रशासनमहामार्ग पोलीस मुख्यालय व जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड येथील नियंत्रण कक्षअपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्थामृत्यूंजय दूत पथक यांना  अपघाताची माहिती दिली. टँकरमधील प्रोपिलीन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने सायं 5.10 वाजता मुंबई बाजूकडे जाणरी वाहतूक अपघाताचे सुमारे 100 मिटर अलीकडे थांबविण्यात आली. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट क्राँक्रीट दुभाजक बाजूला करून तेथून पुणे मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली.

हेलिपॅड उभारणीद्वारे कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत

 हेलिपॅड उभारणीद्वारे कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने रुग्णलयात हलविणे. आपत्ती व्यवस्थापनपोलीसअग्निशमन दलएनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद

 पालकमंत्री ॲड.शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातअशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघातआग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकतेअसे नमूद करुन विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणेसुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे या बाबी महत्वपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरातसी लिंकजवळ हेलिपॅड उभारणी, हेलिपॅडसाठी आवश्यक जागा यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.


वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर

 वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर

पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 6 : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून  गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रेवरळी सी लिंकवर्सोवावांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.


प्राथमिक मूल्यांकनानुसार ही प्राधान्य क्षेत्रे

 विभागीय समन्वय

प्राथमिक मूल्यांकनानुसार ही प्राधान्य क्षेत्रे राज्यातील १९ विभागांशी संबंधित असूनयापैकी १० विभागांनी Deregulation Nodal Officer नेमले आहेत. उर्वरित विभागांमध्येही तातडीने समन्वय साधून कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम उद्योगस्नेहीपारदर्शक व गतिमान प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असेही मुख्य सचिव अग्रवाल यांनी बैठकीत सांगितले.

प्राथमिक मूल्यांकनानुसार ही प्राधान्य क्षेत्रे राज्यातील १९ विभागांशी संबंधित असून,

 विभागीय समन्वय

प्राथमिक मूल्यांकनानुसार ही प्राधान्य क्षेत्रे राज्यातील १९ विभागांशी संबंधित असूनयापैकी १० विभागांनी Deregulation Nodal Officer नेमले आहेत. उर्वरित विभागांमध्येही तातडीने समन्वय साधून कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम उद्योगस्नेहीपारदर्शक व गतिमान प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असेही मुख्य सचिव अग्रवाल यांनी बैठकीत सांगितले.

Featured post

Lakshvedhi