मुंबई शहर जिल्हा निर्यातीत आघाडीवर असून, ‘सेव्हन पॉइंट्स अजेंडा’ राबवून पुढील वर्षी निर्यातीमध्ये डबल डिजिट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याअंतर्गत प्रस्तावित लेदर पार्क व जेम्स अॅण्ड ज्वेलरी क्लस्टरबाबत माहिती देण्यात आली. तसेच उद्योग सह संचालक कार्यालय, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात ओडीओपी ब्रँडिंग व प्रमोशनसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून जागरूकता कार्यक्रम, उद्योग भेटी, संशोधन व ‘एक तालुका दहा निर्यातदार’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 7 February 2026
उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट
यावेळी उद्योग सह संचालक विजू सिरसाठ यांनी मुंबईतील उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. निर्यात धोरण, डिस्ट्रिक्ट अॅज एक्स्पोर्ट हब, नवीन औद्योगिक धोरण तसेच उद्योग विभागाच्या विविध पुढाकारांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरासाठी जेम्स अॅण्ड ज्वेलरी तर मुंबई शहरासाठी लेदर उत्पादनांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Friday, 6 February 2026
इग्नाईट - 2026 मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन
इग्नाईट - 2026 मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन
मुंबई, दि. 4 : राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने Industry and Government Networking for Inclusive Transformation and Empowerment (IGNITE–2026) या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली. 3 फेब्रुवारी 2026 रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झाली.
कार्यशाळेला उद्योग सह संचालक श्रीमती विजू सिरसाठ, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, एसईपीसीचे प्रतिनिधी विवेक बक्षी, एफआयईओ च्या श्रीमती रिषु मिश्रा, IDBI Capital चे विक्रम जैन, सीप्झ संस्थेच्या श्रीमती शामली बॅनर्जी यांच्यासह विविध क्षेत्रांतील 180 प्रतिनिधी उपस्थित होते.
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द · वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द
· वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
मुंबई, दि. 4 : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने कळविले आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.
52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक
52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक
सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असून, त्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
000
वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या
6,600 किलोमीटरचा प्रवास
‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन–2025 ला 30 लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तर 2.9 कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते.
किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती
किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती
या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत 50 टक्के महिला सहभागी आहेत.
या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदर सुरक्षेतील ‘सीआयएसएफ’च्या 51 वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे हा उद्देश आहे.
1969 मध्ये स्थापन झालेल्या ‘सीआयएसएफ’ने गेल्या 57 वर्षांत रिफायनरीज, विमानतळ, बंदरे, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्रे यांसह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जोपासत आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...