Friday, 6 February 2026

कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी

 कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक व मराठवाडा भागातील पाणीटंचाई दूर करणेहा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीपाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रालगतच्या या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित व व्यवस्थापित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत  कार्यवाही सुरू झाली असून या धोरणानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

'नाबार्ड'च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून त्यापैकी साडेआठ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. या निधीतून विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे वितरण करण्याबाबत वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे तसेच कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

नदीजोड प्रकल्पांतील कामांचाआढावा

 नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि 4 :- राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.

 दमणगंगावैतरणागोदावरी नदीजोड प्रकल्पदमणगंगाएकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते

भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून

 आज जगभरातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत. पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून राहीली आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसनातन विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारे आणि सर्वात प्राचीन असे आहेत. आता सरस्वती संस्कृतीच्या उत्खननातूनही या विचारांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि इतिहास या दोन्ही कसोट्यांवर भारतीय जीवन पद्धतीसनातन संस्कृती समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. या भारतीय संस्कृतीने विविधता आत्मसात करूनतिच्या वैभवात भर घातली आहे. ही संस्कृती टिकवण्यात स्वामी सत्यमित्रानंदजी यांच्यासारख्या वाहकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वामीजीनी आपल्या आचरणकार्यातून या संस्कृतीचे पोषण केले. ती भावी पिढ्यांकडे सुपूर्द केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे आता भावी पिढ्याही या सनातन संस्कृतीशी स्वतःला जोडून घेऊ लागली आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. यामागेही या संतमहंताच्या कार्याचा बहुमुल्य आधार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचे, एकसंध ठेवण्याचे कार्य

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीभारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचेएकसंध ठेवण्याचे कार्य करते. तेच कार्य स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी भारत माता मंदिर स्थापनेतून सुरु केले. याशिवाय त्यांनी भारतीय सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. जिथे कुठे आपत्तीसंकट आलेत्या ठिकाणी स्वामीजी धावून गेले. तिथे त्यांनी सगळे भेद बाजूला सारून मदतकार्य केले. यामाध्यमातून सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. या प्रवासात त्यांनी कित्येकदा अनेक पदांचाही त्याग केला आणि आपल्या वैश्विक कार्याला पुढे नेण्यात धन्यता मानली. त्यामुळेच त्यांना जगभर अद्भूत व्यक्तित्व म्हणून सन्मान मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ

 श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती

 

हरिद्वार, दि.४ : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

उत्तराखंड – हरिद्वार येथील श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदप.पू. जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजीपंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारियाउपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्लस्वामी अखिलेश्वरानंदजीस्वामी हरिचेतनानंदजीस्वामी ललितानंद गिरीजीमहंत देवानंदसरस्वतीविनय रोहिलाप्रदीप बत्रा आदी उपस्थित होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार कराव्यात. तसेच योजनेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करावीअसेही कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

 

प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी सादरीकरणाद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प १.० मध्ये राबविण्यात आलेल्या योजनाशेतकरी लाभार्थीयामुळे झालेली फलनिष्पत्ती याची माहिती देऊन प्रकल्प २.० मध्ये करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात तुषार व ठिबक सिंचनामुळे रब्बी व उन्हाळी पिकाखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढले असल्याचे त्यांनी सांगितले .

शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम

 शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे व शेतीतील नफ्याचे प्रमाण वाढवणे बरोबरच या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठीही उपाययोजना राबविण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी कृषीआदिवासी विकासवन विभाग यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करावी.

Featured post

Lakshvedhi