Friday, 6 February 2026

भारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचे, एकसंध ठेवण्याचे कार्य

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीभारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचेएकसंध ठेवण्याचे कार्य करते. तेच कार्य स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी भारत माता मंदिर स्थापनेतून सुरु केले. याशिवाय त्यांनी भारतीय सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. जिथे कुठे आपत्तीसंकट आलेत्या ठिकाणी स्वामीजी धावून गेले. तिथे त्यांनी सगळे भेद बाजूला सारून मदतकार्य केले. यामाध्यमातून सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. या प्रवासात त्यांनी कित्येकदा अनेक पदांचाही त्याग केला आणि आपल्या वैश्विक कार्याला पुढे नेण्यात धन्यता मानली. त्यामुळेच त्यांना जगभर अद्भूत व्यक्तित्व म्हणून सन्मान मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi