Friday, 6 February 2026

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि, ५ : महाराष्ट्र शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींचे ७.४४ टक्के महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३४ (४ फेब्रुवारी २०२६ रोजी उभारलेल्या) ची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  १० फेब्रुवारी,२०२६ रोजी बॅंकेच्या फोर्ट मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १० फेब्रुवारी,२०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ११ फेब्रुवारी,२०२६ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ४ फेब्रुवारी,२०२६ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ फेब्रुवारी,२०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.४४ टक्के  दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ४ ऑगस्ट  आणि ४ फेब्रुवारी  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआरया प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

0000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

 

मुंबईदि. : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छभेटी आणू नयेतशुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेतसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नयेअसे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणेसोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेतहोर्डिंग्स लावू नयेततसेच कोणताही समारंभकार्यक्रम आयोजित करू नयेतअशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

....

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

 गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

 

मुंबईदि. 5 : महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तापरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताएमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जीबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलमुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेअभिनेता अजिंक्य देव आणि अतुल गुप्ता उपस्थित होते.

या प्रदर्शनात विविध जातींच्या पशुंचा समावेश असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. महिला व विद्यार्थ्यांना पशुप्रदर्शन पाहण्यासाठी दुपारच्या वेळी विशेष वेळ ठेवण्यात यावा. तसेच राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी यांनाही निमंत्रित करण्यात यावे. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी यावेळी केले.

 असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्थाडॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिरअवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन

 पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीसशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधनाचीत्यांच्या निगराणीविषयक तसेच या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावीयासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टिकोनातून प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. या प्रदर्शनात जैविक शेतीपशुधनापासून होणारे लाभ याविषयी माहिती शेतकऱ्यांना मिळावीयासाठी चर्चासत्रे आयोजित करण्यात यावीत.

शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा

 शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा

- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

§  परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा

मुंबईदि. 5 : राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत महापशुधन एक्स्पो हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टिने या प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावीअसे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत महापशुधन एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरेबीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


शेतकरी, बियाणे उद्योग, सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योग, खत उद्योग, काढणीपश्चात प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग

 शेतकरीबियाणे उद्योगसूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगखत उद्योगकाढणीपश्चात प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि देशाची आर्थिक ताकद वाढेलअसा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. आयएमएमए ही संस्था 1983 पासून कार्यरत असूनगेल्या अनेक दशकात पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविण्यात तिने उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

Featured post

Lakshvedhi