असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 6 February 2026
या प्रदर्शनात विविध जातींच्या पशुंचा समावेश असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. महिला व विद्यार्थ्यांना पशुप्रदर्शन पाहण्यासाठी दुपारच्या वेळी विशेष वेळ ठेवण्यात यावा. तसेच राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी यांनाही निमंत्रित करण्यात यावे. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी यावेळी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment