या प्रदर्शनात विविध जातींच्या पशुंचा समावेश असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 6 February 2026
राज्य शासनाच्या कृषी, महिला व बालविकास यासह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल
पशुप्रदर्शनात 1500 पशु प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय राज्य शासनाच्या कृषी, महिला व बालविकास यासह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल असणार आहेत. तसेच बचतगटांचे स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने या सर्वांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रदर्शनाचा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात यावा. महिलांसाठी वेगळा कक्ष उभारून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा व सुरक्षितता उपलब्ध असावी. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पशुंच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. त्याशिवाय वैद्यकीय सुविधा कक्ष, रुग्णावाहिका, अग्निशमन यंत्रणा, पोलिस संरक्षण, स्वयंसेवक यांचीही नियुक्त करण्यात यावी, अशे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले.
Thursday, 5 February 2026
सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधनाची, त्यांच्या निगराणीविषयक तसेच या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टिकोनातून प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. या प्रदर्शनात जैविक शेती, पशुधनापासून होणारे लाभ याविषयी माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी चर्चासत्रे आयोजित करण्यात यावीत.
शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा
शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा
- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
§ परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा
मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टिने या प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारताने 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे ध्येय साध्य
जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारताने 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संशोधन व विकासावर भर दिला आहे. या अनुषंगाने नवीन उत्पादने, नवीन सूक्ष्म अन्नद्रव्ये विकसित करून भारतीय कृषी उद्योगाला जागतिक पातळीवर नेतृत्वस्थानी नेण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगत, आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक नेतृत्व करणारा भारत घडवूया, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले.
शेतकरी, बियाणे उद्योग, सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योग, खत उद्योग, काढणीपश्चात प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग
शेतकरी, बियाणे उद्योग, सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योग, खत उद्योग, काढणीपश्चात प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि देशाची आर्थिक ताकद वाढेल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. आयएमएमए ही संस्था 1983 पासून कार्यरत असून, गेल्या अनेक दशकात पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविण्यात तिने उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अभिनेता अजिंक्य देव आणि अतुल गुप्ता उपस्थित होते