Thursday, 5 February 2026

पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेस' उपचारांकडे नागरिकांचा ओढा

 पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेसउपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. 'वेलनेसउपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना 'वेलनेसकडे वळविण्यात यावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन 'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा

 मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्सचे आयोजन

'पल्सपरिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँडनिर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ५ : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्सया वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरयेथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञअभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

 

'पल्सवैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेसउपचारांचा  वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँडनिर्माण करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

पु.ल.कट्ट्यावर 6 फेब्रुवारी व लतादीदींच्या सूरांचा जागर संगीतप्रेमी आणि रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

 पु.ल.कट्ट्यावर 6 फेब्रुवारी व लतादीदींच्या सूरांचा जागर

संगीतप्रेमी आणि रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

 

मुंबईदि. 5 : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पु. ल. कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आवाजातील अजरामर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणातील खुल्या रंगमंचावर या कार्यक्रमाचे सादरीकरण शुक्रवार6 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेली निवडक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गीते आणि त्यांच्या अतुलनीय कारकीर्दीवरील मान्यवरांची मनोगतेही दृकश्राव्य स्वरूपात सादर होतील.  त्याचबरोबरज्येष्ठ संगीत रसिकनौशाद संगीत समितीचे काका जे. पी. यांच्याकडून दीदींच्या आयुष्यातील काही दुर्मीळ आठवणीप्रसंग प्रत्यक्ष ऐकायला मिळतील.

            या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व संगीतप्रेमी आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. कलेचा आनंदविचारांची मेजवानी आणि सुरांची मैफल अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून करण्यात येत आहे.

आयटीआयंचे पायाभूत सुविधा वाढविणे, नवीन काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करणे आणि उद्योग-नेतृत्वाखालील प्रशासन राबवणे, विकसित भारत २०४७

  पीएम-सेतू ही  योजना ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली असून, पाच वर्षांत ६०,००० कोटींच्या तरतुदीसह आयटीआयंचे पायाभूत सुविधा वाढविणे, नवीन काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करणे आणि उद्योग-नेतृत्वाखालील प्रशासन राबवणे, विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी संलग्न कुशल व रोजगारक्षम युवक घडविण्याचा या योजनेचा हेतू आहे.

ऑटोमोटिव्ह,  बांधकाम, वस्त्रोद्योग, एफएमसीजी, इलेक्ट्रॉनिक्स, तेल व वायू तसेच नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांतील सुमारे ३६ पात्र कंपन्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला

हब-अँड-स्पोक आयटीआय मॉडेल, विशेष उद्देश वाहने (SPV) यांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील नवकल्पना

  चर्चासत्रात हब-अँड-स्पोक आयटीआय मॉडेल, विशेष उद्देश वाहने (SPV) यांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील  नवकल्पना तसेच रोजगार परिणाम यांवर होता. उद्योग भागीदारांनी सहकार्याचे फायदे अधोरेखित केले. नोकरीसाठी तयार प्रशिक्षणार्थ्यांची विश्वासार्ह साखळी, आधुनिक प्रयोगशाळा व प्रगत उपकरणांपर्यंत प्रवेश,आयटीआयंचा उत्पादन केंद्रे व नवोन्मेष केंद्रे म्हणून वापर करण्याच्या संधींचाही उल्लेख केला, तसेच प्रशासन रचनेतील बहुसंख्य नियंत्रण, अध्यापन पद्धती व प्राध्यापक कौशल्यवृद्धीवर प्रभाव, नियोक्ता ब्रँडिंगमध्ये वाढ आणि सीएसआर व ईएसजी प्राधान्यांशी संरेखन यांसारख्या धोरणात्मक लाभांवर भर दिला

विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी संलग्न कुशल व रोजगारक्षम युवक घडविणारे पीएम-सेतू चर्चासत्र

 विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी संलग्न

                   कुशल व रोजगारक्षम युवक घडविणारे पीएम-सेतू चर्चासत्र

 

        मुंबई, दि.५ : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) यांच्यातर्फे पुणे येथे पीएम-सेतू (प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआयज) योजनेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून एक महत्त्वपूर्ण उद्योग चर्चासत्र नुकतेच पार पडले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (यशदा) येथे

या कार्यक्रमाला  केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या देबाश्री मुखर्जी,अपर मुख्य सचिव कौशल्य विकास विभाग मनीषा वर्मा या उपस्थित होत्या. यावेळी  आयटीआय औंध, पुणे, फ्रोनियस इंडिया प्रा. लि., भोसरी तसेच लाइटहाऊस, निगडी येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यालयीन भेटी देण्यात आल्या.

संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील घनिष्ठ समन्वयावर भर

 जर्मन प्रतिनिधीमंडळाने कार्लस्रुहे येथील नाविन्यता मॉडेलविषयी माहिती देताना संशोधन संस्थाउद्योगस्टार्टअप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील घनिष्ठ समन्वयावर भर दिला. अशा मॉडेल्समधून महाराष्ट्रासारख्या प्रदेशांनाजे नाविन्यता पायाभूत सुविधा बळकट करताना समावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करत आहेतमहत्त्वाचे धडे घेता येऊ शकतात. ही बैठक दोन्ही परिसंस्थांमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. या चर्चांचे ठोस सहकार्यामध्ये रूपांतर झाल्यास,महाराष्ट्र आणि कार्लस्रुहे यांच्यातील संवाद आंतरराष्ट्रीय नाविन्यता सहकार्यगुंतवणूक आणि सामायिक विकासासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.

Featured post

Lakshvedhi