Thursday, 5 February 2026

'एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा

 'एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा

 मुंबईदि.४ : अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे विभागांतर्गत असलेल्या सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील ५८३ रिक्त जागांसाठी १ मार्च२०२६ रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार असल्याचे आदिवासी विकास कार्यालय, ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता सहावीच्या ३६० जागा (१८० मुले व १८० मुली) विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर इयत्ता सातवी ते नववीच्या २२३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व पूर्वपरीक्षेद्वारेप्रवेश मिळणार आहे.

सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी एकूण ६० प्रवेश क्षमता असणार आहे. तर इयत्ता सातवीआठवी व नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर पूर्वपरीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शाळानिहाय रिक्त जागांचा तपशील :- कांबळगाव ७०शेंडेगाव ७७सवणे ८०पळसुंडे (जव्हार) : १२७हिरवे (मोखाडा) १४७चळणी (डहाणू) ८२ अशा एकूण ५८३ जागा रिक्त आहेतअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन

 परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी

आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन

 

मुंबईदि. ४ : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडीपदव्युत्तर पदवीपदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याच्या परदेशातील उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नांना बळ मिळते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ४० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड केली जाणार असून इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करावेत असेआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावायासाठी आदिवासी विकास विभागाकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत  २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्कनिर्वाह भत्ता (निवास व भोजन)शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्चविमान प्रवास खर्चव्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च युएएस व इतर देशांसाठी (युके वगळून) १५०० युएस डॉलर तर युकेसाठी ११०० जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.

       लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्त्पन्न ८ लाख रुपये तसेच विद्यापीठांची क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल केली जाईल. तर क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS यासारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे.

 शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले. या योजनेचे पात्रता निकष :- विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे. TOEFL, IELTS किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

0000

मुंबई शहर जिल्हा निर्यातीत आघाडीवर

 मुंबई शहर जिल्हा निर्यातीत आघाडीवर असून, ‘सेव्हन पॉइंट्स अजेंडा’ राबवून पुढील वर्षी निर्यातीमध्ये डबल डिजिट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याअंतर्गत प्रस्तावित लेदर पार्क व जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी क्लस्टरबाबत माहिती देण्यात आली. तसेच उद्योग सह संचालक कार्यालयऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमुंबई यांच्यात ओडीओपी ब्रँडिंग व प्रमोशनसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून जागरूकता कार्यक्रमउद्योग भेटीसंशोधन व एक तालुका दहा निर्यातदार’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मुंबईतील उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका

 उद्योग सह संचालक विजू सिरसाठ यांनी मुंबईतील उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. निर्यात धोरणडिस्ट्रिक्ट अ‍ॅज एक्स्पोर्ट हबनवीन औद्योगिक धोरण तसेच उद्योग विभागाच्या विविध पुढाकारांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरासाठी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी तर मुंबई शहरासाठी लेदर उत्पादनांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इग्नाईट - 2026 मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

 इग्नाईट - 2026 मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

मुंबईदि. 4 : राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने Industry and Government Networking for Inclusive Transformation and Empowerment (IGNITE–2026) या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहर अर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली. 3 फेब्रुवारी 2026 रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे झाली.

कार्यशाळेला उद्योग सह संचालक श्रीमती विजू सिरसाठवर्ल्ड ट्रेड सेंटरमुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्रीएसईपीसीचे प्रतिनिधी विवेक बक्षीएफआयईओ च्या श्रीमती रिषु मिश्रा, IDBI Capital चे विक्रम जैनसीप्झ संस्थेच्या श्रीमती शामली बॅनर्जी यांच्यासह विविध क्षेत्रांतील 180 प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द · वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

 पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द

·         वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

 

मुंबईदि. 4 : पुणेमुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असूनपरिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतीलअसे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने कळविले आहे.

 

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसारया अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

 

तसेचया एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46सोलापूर विभागातील 36पुणे विभागातील 20सांगली विभागातील 18कोल्हापूर विभागातील 13पालघर विभागातील 12ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.

 

52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक

 52 किनारी गावांना तट प्रहरी’ म्हणून दत्तक

            सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असूनत्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमनाट्यप्रयोगवैद्यकीय सेवाखुली व्यायामशाळाक्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहेत्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथकएनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

000

Featured post

Lakshvedhi