Wednesday, 4 February 2026

ऊर्जा व औद्योगिक विकासाला चालना

 ऊर्जा व औद्योगिक विकासाला चालना

ऊर्जाऔद्योगिक कॉरिडॉरस्मार्ट सिटी मिशन आणि लॉजिस्टिक हबमुळे महाराष्ट्र गुंतवणुकीचे केंद्र बनत असून युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सुरक्षा

 सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सुरक्षा

एम्स नागपूरसारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील आरोग्य सुविधा बळकट होत असून आयुष्मान भारत योजनेंतर्गत ३.८३ कोटींपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड्स वितरित करण्यात आली आहेत.

उज्ज्वला योजनाजनधन योजनाजल जीवन मिशनअन्न सुरक्षा योजनांमुळे कोट्यवधी कुटुंबांना थेट लाभ मिळत आहे.

मेट्रो, रस्ते व सार्वजनिक बांधकाम

 मेट्रो, रस्ते व सार्वजनिक बांधकाम


मुंबई, पुणे, नागपूर व ठाणे येथील मेट्रो प्रकल्पांमुळे शहरी वाहतूक सुलभ होत असून राष्ट्रीय महामार्ग व भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १८,४६२ किमीपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात आले आहेत. यामुळे उद्योग, व्यापार व रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे.

रेल्वे व दळणवळण क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक

 रेल्वे व दळणवळण क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक

महाराष्ट्रासाठी रेल्वे क्षेत्रात १५,९४० कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवंदे भारत एक्सप्रेसतसेच अमृत भारत योजनेंतर्गत १२८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे. यामुळे प्रवासी सुविधासुरक्षितता व वेगवान प्रवासाला चालना मिळणार आहे.


कर्करोग उपचार अधिक परवडणारे

 कर्करोग उपचार अधिक परवडणारे

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प अत्यंत दिलासादायक असल्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे -  बोर्डीकर यांनी सांगितले. कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १७ अत्यावश्यक औषधांवरील सीमाशुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्करोग रुग्णांच्या उपचार खर्चात मोठी घट होणार असून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कर्करोगावरील उपचार अधिक सुलभपरवडणारे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत.

शी-मार्ट्स’द्वारे ग्रामीण महिला उद्योजकतेला नवे बळ

 शी-मार्ट्सद्वारे ग्रामीण महिला उद्योजकतेला नवे बळ

या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा व क्रांतिकारी निर्णय म्हणजे शी-मार्ट्स (Self Help Entrepreneur Marts)’ ही नवी संकल्पना असल्याचे श्रीमती साकोरे - बोर्डीकर यांनी नमूद केले. या शी-मार्ट्सच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना केवळ कर्जावर आधारित उपजीविकेपुरते मर्यादित न ठेवता शाश्वत उद्योगांच्या मालकीकडे नेण्याचा मार्ग खुला होणार आहे. शी-मार्ट्स हे समुदाय-मालकीची किरकोळ विक्री केंद्रे म्हणून उभारण्यात येणार असून येथे महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयं-सहायता गटमहिला उत्पादक कंपन्या आणि लघुउद्योगांना त्यांच्या उत्पादनांसाठी खात्रीशीर व स्थिर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

या माध्यमातून ग्रामीण महिला उद्योजकांसाठी सुधारितनाविन्यपूर्ण आणि सुलभ वित्तपुरवठा व्यवस्था निर्माण होणार असून महिला नोकरी शोधणाऱ्या नव्हेतर नोकरी देणाऱ्या’ बनतीलअसा विश्वास राज्यमंत्री श्रीमती साकोरे - बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; महिला उद्योजकता, आरोग्य, पायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

 केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;

महिला उद्योजकता, आरोग्यपायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

-राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर

 

मुंबई,दि.३ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरणसार्वजनिक आरोग्यपायाभूत सुविधाऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जामहिला व बालविकाससार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi