Monday, 2 February 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वाढता वापर हा कृषी पणन व्यवस्थेतही क्रांतिकारक बदल

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वाढता वापर हा कृषी पणन व्यवस्थेतही क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल. उत्पादनाचा अंदाजमागणी-पुरवठा विश्लेषणकिमतींचे पूर्वानुमान आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक सक्षम झाल्याने बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढेल. यामुळे शेतमालाची साठवणूकवाहतूक व विक्री अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

हा अर्थसंकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्री, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी

 हा अर्थसंकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्रीमूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी वाढवणारा असल्याने कृषी पणन व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात कृषी व कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देताना शेतमाल थेट बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. एक जिल्हा- एक उत्पादन’ या संकल्पनेमुळे स्थानिक पातळीवरील शेतमालप्रक्रिया केलेली उत्पादने आणि हस्तकला वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असून याचा थेट फायदा शेतकरी व उत्पादक समूहांना होणार आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होईलअसे मंत्री रावल यांनी सांगितले.

उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्री, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी

 हा अर्थसंकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्रीमूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी वाढवणारा असल्याने कृषी पणन व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात कृषी व कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देताना शेतमाल थेट बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. एक जिल्हा- एक उत्पादन’ या संकल्पनेमुळे स्थानिक पातळीवरील शेतमालप्रक्रिया केलेली उत्पादने आणि हस्तकला वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असून याचा थेट फायदा शेतकरी व उत्पादक समूहांना होणार आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होईलअसे मंत्री रावल यांनी सांगितले.

विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प

 विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प

-         पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि.1 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारासर्वसमावेशक आणि देशाच्या दीर्घकालीन विकासाची स्पष्ट दिशा मांडणारा आहेअशी प्रतिक्रिया राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. या अर्थसंकल्पातून ग्रामीण व शहरी विकासातील समतोलरोजगारनिर्मितीपायाभूत सुविधा विस्तार आणि आत्मनिर्भर भारत या चारही क्षेत्रांना एकाच वेळी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार

 मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत. देशभरात सात  हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून यात मुंबई आणि पुणे ही जोडण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. तसेच तरुणांना  रोजगाराच्या संधी सह एमएसएमई (MSME) क्षेत्राला जागतिक स्तरावर अग्रणी बनवण्यासाठी सहा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीने परिपूर्ण असा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी मांडला असून  भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे.

नव्या विद्यापीठासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये स्थापन करण्यात येणार

 त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर ही भर देण्यात आला असून पाच नव्या विद्यापीठासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या निमित्ताने भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने एबीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.या अनुषंगाने १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयात कंटेंट क्रिएटर लॅबची सुरुवात होणार आहे. ज्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची घोषणा देखील  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.

देशातील मध्यमवर्ग, गरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे

 मंत्री श्री लोढा म्हणाले की,देशातील मध्यमवर्गगरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे शिखर गाठणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI तंत्रज्ञान विकसित करून अत्याधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बायो फार्मा मिशनऔषधांच्या केवळ किमती कमी करणारे नाही तरजागतिक औषध बाजारपेठेत भारत एक औषध निर्मितीचे ग्लोबल हब होणार आहे.

Featured post

Lakshvedhi