Sunday, 25 January 2026

'जनगणना 2027' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर शासकीय अधिसूचना जारी

  

'जनगणना 2027अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे

वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

        • शासकीय अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली23 : देशातील 'जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 'घरयादीआणि 'गृहगणनाकेली जाणार असूनयासाठी सरकारने 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकीघराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्परमजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्याकुटुंब प्रमुखाचे नावलिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जातीअनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील. घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहेस्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी, विजेची व्यवस्थासांडपाणी निचराशौचालयाची उपलब्धता आहे कायाचीही नोंद केली जाणार आहे.

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक

 बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवनसंवर्धन आवश्यक

  • मृद  जलसंधारण सचिव गणेश पाटील 

 

मुंबईदि. 23 : स्वच्छ  शाश्वत बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेतविविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे बरेच झरे आटत चालले आहेतआपली पाण्याची गरज मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत्यामुळे बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झऱ्यांचे पुनर्भरण  संवर्धन आवश्यक असूनत्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मृद  जलसंधारण विभाग लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी व्यक्त दिली.

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व ग्रामपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथे आयोजित झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे तसेच पुणेसाताराकोल्हापूररायगडसिंधूदुर्गरत्नागिरीअहिल्यानगरनाशिकनंदुरबार या जिल्हयातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

झऱ्यांचे पुनर्जीवन  संवर्धन यासाठी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नवीन विषयात झोकून देऊन काम कराया विषयातील जाणकार बना आणि पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

यावेळी ॲक्वाडॅमचे संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील झऱ्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण याबाबत मार्गदर्शन केले. झरा हा भूजलाचा सर्वात पुरातन स्त्रोत असूनपाण्याचा हा स्त्रोत पर्यावरणपरक असल्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठीशासनया क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाज्ज्ञनाबार्ड आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

 योजनेविषयी माहिती :

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहनचालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस  नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.

त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.

• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असूनमहाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधीदेणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत

 परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले कीशहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडीव पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्यूशनचे संस्थापक प्रा.भट्ट आणि त्यांच्या टीमने सामाजिक जबाबदारीतून कोणताही आर्थिक भार न टाकता महिलांना सुरक्षा देणारा पर्यायी उपाय विकसित केला. कोरोना काळातील अडचणीप्रशासकीय नियमांचा अभाव आणि तांत्रिक आव्हाने असूनही त्यांनी हार न मानता हा प्रकल्प पुढे नेला. परिवहन विभागपोलीस यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरशी एकात्मता साधत हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला असल्याचे आयुक्त  भिमनवार यांनी सांगितले.

हा उपक्रम सध्या ऐच्छिक असला तरी त्याची व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन परिवहन आयुक्त भिमनवार यांनी केले. ऑटो रिक्षांच्या मागील बाजूस माहिती फलक लावणेअ‍ॅपचा वापर वाढवणे आणि प्रवासी व चालकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य प्रतिसाद यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरच्या सतत सज्जतेवरच या प्रकल्पाचे यश अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला सुरक्षेसाठी हा उपक्रम देशासाठी आदर्श ठरेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त 

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

 महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी

 ‘बीग्सीअभिनवखर्चमुक्त उपक्रम

- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

 

मुंबईदि. २३ : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहीलअसा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलीसमोटार परिवहन विभागवाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवायया सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामतवाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डेमुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते.

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

  

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी

दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

  • मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

 

नवी दिल्ली, दि. 22: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  बैठकीत महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाबाबत आणि कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

 

बैठकीत प्रामुख्याने एसपीएफ कोळंबी ब्रूडस्टॉक, पीपीएल आणि जिवंत खाद्य आयात करण्याशी संबंधित विविध कायदेशीर व तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोळंबी उत्पादनात शाश्वत वाढ साध्य करतानाच जैवसुरक्षेचे कडक नियम पाळणे, आयात प्रक्रिया सुलभ करणे आणि देशातील मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.

 

या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल उपस्थित होते. तसेच, भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयसीएआर (ICAR) संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, एमपीईडीए आणि सीएए चे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळंबी शेती, हॅचरी, निर्यात आणि मत्स्य खाद्य क्षेत्रातील विविध भागधारकांनीही या चर्चेत सहभाग घेऊन मत्स्यव्यवसा

कसा असेल चित्ररथ?

 कसा असेल चित्ररथ?

महाराष्ट्राच्या या चित्ररथाची रचना अत्यंत कलात्मक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला एक भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपारिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्रीशक्तीचे दर्शन घडवेल. चित्ररथाच्या मध्यभागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभक्त दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असूनइतर सांस्कृतिक बाबींचेही बारकाव्यांसह दर्शन घडवण्यात आले आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक असेल.

 

यंदाचा हा सोहळा 'जनभागीदारी'वर आधारित असूनसंचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित होणाऱ्या 'भारत पर्व'मध्ये देखील देशवासियांना महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

Featured post

Lakshvedhi