Wednesday, 21 January 2026

रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती

 रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणानवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती

नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु करु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनीयामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासनएमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करण्यात येत  आहे. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्सफिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाले आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुपस्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुपएन्सारफेडेक्स हे अमेरितील समूहफिनलंडचा रिव्हर रिसायकल समूहदुबईचा एमजीएसए समूहसिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्रीजीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूहअमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.

शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्य

 शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्य

राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रय़त्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपल्याला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करण्याचा प्रय़त्न. त्यासाठी जगातील अशी सुविधा उभ्या करणाऱ्या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आला आहे.

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा - तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

 ज्ञानतंत्रज्ञानविदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा

-   

तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणाएक लाख कोटींची गुंतवणूक येणार

 

 

दावोसदि. 21 :स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञानतंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.

आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियायुनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेटेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकअर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह -लंडनआयसीसीआय-इटलीअँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूटनॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूटअर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग – सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार केले आहेत. यातून एक प्रकारे केवळ गुंतवणूक नाहीतर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतीलवेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारितीने काम करता येईल. अर्बन प्लॅनिंगट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची सरंचना चांगल्या रितीने करता येणार आहे.

दावोस दौऱ्यातून नॉलेज-ज्ञानटेक्नॉलॉजी-तंत्रज्ञान आणि एफडीआय-विदेशी गुंतवणूक मिळविता येते. त्याचा देशाला आणि पर्यायाने राज्याला मोठा फायदा होतो. यंदा नागरी क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्याशी संवादसमन्वय साधता आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले

These investments span across green energy, food processing

 These investments span across green energy, food processing, steel manufacturing, IT-ITES, data centres, EV-automobile, shipbuilding and digital infrastructure sectors. The projects will be implemented in Mumbai, Ratnagiri, Palghar, Gadchiroli and Ahilyanagar, thereby accelerating industrial growth and large-scale employment generation in these regions.

Maharashtra Is the Powerhouse of India’s Future – Chief Minister Devendra

 Maharashtra Is the Powerhouse of India’s Future

– Chief Minister Devendra Fadnavis

•₹14.50 lakh crore worth of 19 MoUs signed on the very first day
• 15 lakh employment opportunities; major investments in IT, Data Centres and Green Energy
• Strong confidence of record-breaking investments surpassing last year

Davos, January 20 : Reinforcing Chief Minister Devendra Fadnavis’ assertion that Maharashtra is the Gateway of India for industry and investment, Memorandums of Understanding (MoUs) worth an unprecedented ₹14.50 lakh crore were signed on the very first day, leading to the creation of 15 lakh employment opportunities in the State.

Through the Department of Industries, Investment and Commerce, the Government of Maharashtra signed these MoUs with representatives from various sectors in the presence of Chief Minister Devendra Fadnavis and Industries Minister Dr. Uday Samant.

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

 दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी

 शिक्षण मंडळ सज्ज

 

मुंबईदि. २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज असल्याचे मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांनी कळविले आहे. 

 

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळामार्फत सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. परीक्षेकरिता दक्षता समिती गठीत करण्यात आली असून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी तसेच परीक्षा देताना काय करावे आणि काय करू नयेयाबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे. 

 

“हिंद दी चादर” शहीदी समागमनिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन


हिंद दी चादर शहीदी समागमनिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन

 

नांदेडदि. २० जानेवारी:- नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हिंद दी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवरकार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहापाणीनाश्ताफलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्थाव्यापारी व व्यावसायिक आस्थापनाउद्योजकशासकीय कार्यालयेबँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे यावेअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

सेवा हीच खरी श्रद्धांजली असूनसेवा स्टॉलच्या माध्यमातून समाजसेवेची संधी सर्वांनी साधावीअसे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

 

सेवा स्टॉल्सच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयनांदेड येथे तहसीलदार (महसूल) यांचेशी संपर्क साधावाअसेही त्यांनी कळविले आहे.

०००००

Featured post

Lakshvedhi