Monday, 19 January 2026

विनामूल्य सेवा स्टॉल

 विनामूल्य सेवा स्टॉल

कार्यक्रम स्थळाच्या चारही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात चहापाणीनाश्ताफळे यांचे विनामूल्य सेवा स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ही व्यवस्था लाखो भाविकांच्या सोयीसाठी असूननिःस्वार्थ सेवेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवणारी आहे. सेवा करताना कोणताही मोबदलामान-सन्मान किंवा प्रसिद्धी अपेक्षित नसूनकेवळ गुरूंच्या नावाने सेवा करण्याचा आनंद स्वयंसेवक अनुभवणार आहेत.

लंगर : समानतेचा आणि मानवतेचा महासागर

 लंगर : समानतेचा आणि मानवतेचा महासागर

या भव्य शहीदी समागमात भाविकांच्या सोयीसाठी १२ भव्य लंगर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक लंगरमध्ये एकावेळी सुमारे ३ हजार भाविक बसून भोजन करू शकतीलअशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.

२४ व २५ जानेवारी रोजी हे लंगर सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अखंड सुरू राहणार आहे.

लंगर म्हणजे केवळ अन्नसेवा नाहीतर समानतेची शिकवण आहे. येथे जातधर्मभाषादेशश्रीमंती-गरिबी यांचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकाच पंक्तीत बसून गुरूचा प्रसाद स्वीकारणार आहेत. हा दृश्य अनुभव गुरू नानक देवजींच्या सर्व मानव समान आहेत या विचाराचा साक्षात्कार घडवणारा असेल.

श्रमदानातून उभी राहणारी सेवा संस्कृती

 श्रमदानातून उभी राहणारी सेवा संस्कृती

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग म्हणजे नुकतेच पार पडलेले भव्य श्रमदान. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी श्रमदान करण्यात आले. मैदानावरील खडे उचलणेजमिनीची स्वच्छता करणेचालण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करणे ही सर्व कामे सेवाभावाने करण्यात आली.

प्रशासनविद्यार्थी,स्वयंसेवक आणि भाविकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सेवेतून भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरले. गुरूंच्या शिकवणीनुसार सेवा हीच खरी साधना असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला.

मुख्य मंडप, अनवाणी चालण्याची परंपरा आणि श्रद्धेचा सन्मान

 मुख्य मंडपअनवाणी चालण्याची परंपरा आणि श्रद्धेचा सन्मान

कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंडपात दोनही दिवस श्री गुरु ग्रंथसाहिब विराजमान राहणार आहे. गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणारे सर्व भाविकमान्यवरपदाधिकारी व अतिथी कार्यक्रम स्थळी अनवाणी चालणार आहेत.

ही परंपरा केवळ धार्मिक शिस्त नसून अहंकार त्यागनम्रता आणि गुरूचरणी समर्पणाची भावना व्यक्त करणारी आहे. लाखो भाविक अनवाणी चालत गुरूच्या दर्शनासाठी येणारहे दृश्यच सेवेतून भक्तीचा खरा अर्थ उलगडून दाखवणारे ठरणार आहे.तसेच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जन्म गाव नरसी नामदेव येथून वारकरी दिंड्या पायी चालत नांदेड येथे समागम स्थळी येणार आहेत.

नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग

 नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग

या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीखसिकलीकरबंजारालबानामोहियालसिंधीवाल्मिकीउदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाजांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

ही संयुक्त रचना स्वतः गुरूंच्या विचारांची जिवंत साक्ष आहे. सर्व धर्म समानसर्व मानव समान हा संदेश या आयोजनातून ठळकपणे अधोरेखित होतो.

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

  

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी

केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांना निमंत्रण

 

नवी दिल्ली, दि. 19 : 'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त हिंद दी चादर हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.

 

नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष)समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराजनांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंगसमन्वयक श्री. रामेश्वर नाईकसहसमन्वयक जसपाल सिंगसदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.

 

नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेचपं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतीलअशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

0000


“शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनाअंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोपइस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनामफिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशियाव्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असूनया दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी१ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग करून राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे.विशेष बाब म्हणजे, २०१९ नंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच परदेश अभ्यास दौरा असून कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

Featured post

Lakshvedhi