Monday, 19 January 2026

नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग

 नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग

या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीखसिकलीकरबंजारालबानामोहियालसिंधीवाल्मिकीउदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाजांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

ही संयुक्त रचना स्वतः गुरूंच्या विचारांची जिवंत साक्ष आहे. सर्व धर्म समानसर्व मानव समान हा संदेश या आयोजनातून ठळकपणे अधोरेखित होतो.

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

  

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी

केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांना निमंत्रण

 

नवी दिल्ली, दि. 19 : 'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त हिंद दी चादर हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.

 

नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष)समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराजनांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंगसमन्वयक श्री. रामेश्वर नाईकसहसमन्वयक जसपाल सिंगसदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.

 

नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेचपं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतीलअशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

0000


“शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनाअंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोपइस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनामफिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशियाव्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असूनया दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी१ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग करून राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे.विशेष बाब म्हणजे, २०१९ नंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच परदेश अभ्यास दौरा असून कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा · कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

·         कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 

मुंबई,दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनामधील रवाना झालेल्या शेतक-यांना  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावाअसे आवाहन केले.

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनाअंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोपइस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनामफिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशियाव्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असूनया दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी१ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची

 कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची

– जिल्हाधिकारी

 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले कीसध्याच्या काळात सोशल माध्यमे ही प्रभावी प्रसिद्धीची साधने ठरत असूनत्यामध्ये इंस्टाग्राम हे अल्प कालावधीत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेड येथे आयोजित हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरइंस्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांचा सकारात्मक व प्रभावी वापर करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. यासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील इन्फ्ल्युएन्सर्सनी पुढे येऊन सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्यसेवा आणि बलिदानाचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने समाज माध्यमातून त्याचा आशय प्रभावीपणे प्रसारित करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

 सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

– सचिव रुचेश जयवंशी

नांदेडदि. १८: नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित हिंद-दी-चादर कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असूनया भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्या गठीत करण्यात आल्या असूनया समित्यांमार्फत प्रत्येक लहान-मोठ्या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा हा कार्यक्रम यशस्वी होईलअशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभागराज्यस्तरीय समिती तसेच शीखसिकलीकरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीकीउदासीनभगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन मोदी मैदाननांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मैदानावर गठीत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर

 ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकछत्रपती संभाजीनगर माहिती विभागाचे प्र.उपसंचालक प्रशांत दैठणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने (छत्रपती संभाजीनगर),अरुण सूर्यवंशी (जालना),गोपाळ साळुंखे (धुळे)सुनील सोनटक्के (सोलापूर)डॉ. रवींद्र ठाकूर (जळगाव) आणि छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहायक संचालक गणेश फुंदे यांनी सहभाग नोंदविला. सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या जिल्ह्यातील प्रसिद्धी नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

Featured post

Lakshvedhi