परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा
· कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना
मुंबई,दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
“शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”अंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोप, इस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असून, या दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, १ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment