Monday, 19 January 2026

सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

 सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

– सचिव रुचेश जयवंशी

नांदेडदि. १८: नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित हिंद-दी-चादर कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असूनया भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्या गठीत करण्यात आल्या असूनया समित्यांमार्फत प्रत्येक लहान-मोठ्या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा हा कार्यक्रम यशस्वी होईलअशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभागराज्यस्तरीय समिती तसेच शीखसिकलीकरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीकीउदासीनभगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन मोदी मैदाननांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मैदानावर गठीत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi