Monday, 19 January 2026

मराठी बांधवांचे कार्य महाराष्ट्राचा पासपोर्ट

 मराठी बांधवांचे कार्य महाराष्ट्राचा पासपोर्ट...!

ते म्हणाले कीपारंपरिक वेशपारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तीनही गोष्टी बघायला मिळाल्याने. एक प्रकारे आपण परदेशात राहणारी मंडळीमहाराष्ट्राचे आणि मराठीचे राजदूत आहात. महाराष्ट्राची संस्कृतीआपली भाषा याचा परिणाम आणि प्रभाव तयार करता. मराठी बांधवांनी जगभरात नाव कमावले आहे. आपल्याकडे पाहूनअनेक देशात मराठी माणसाला सन्मान मिळतो. कारण आपल्या देशातील मराठी लोकांनी चांगलं काम केले आहे. त्या-त्या देशाच्या संस्कृतीमध्येव्यवसायउद्योग-व्यवसायामध्ये जे-जे योगदान दिले आहेत्यामुळे आम्हालाही सन्मान मिळतो. या देशातील उद्योगांनाही आपल्याला भारतात कुठे जायचे आहेतर भारतात जायचे असे वाटते. कारण मराठी माणूस अतिथ्यशीलस्वागतशील आणि उद्मशील आहे. मराठी माणूस मेहनती आहे. अशा पद्धतीने मराठी माणसाची प्रतिमा आपण निर्माण केली आहे. याच जोरावर यंदाही महाराष्ट्र दावोस मधील गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राचा बोलबोला राहील...!

ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

 ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले कीसौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्यावेंडर्स,  कामगारदेखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

 सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करुअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

 सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करुअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

 सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतूजनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने  शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी ,खूप चांगली असल्याने अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार कुसुम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करुन आपण  प्रतिक्षा कालावधी कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारीतंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

 सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

 

 

छत्रपती संभाजीनगरदि.५:- देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले यावेळी उपस्थित होते.

नवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज

 कामगार मंत्री फुंडकर म्हणालेनवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज असावे. या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा. कामगार संहितेबाबत जनजागृती करण्यात यावी. राज्यात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कामगार कायदे आणि नवीन कामगार संहिता यामधील बदल लक्षात घेऊन त्यानुसार अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी.

 

वेतन संहिताऔद्योगिक संबंध संहितासामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती संहिता या चार नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू करण्यात आल्या आहेत. राज्यामधील असलेल्या कामगार कायद्यांच्या तरतुदी आणि नवीन कामगार संहितांच्या तरतुदींचा विस्तृत आढावा सादरीकरणाद्वारे यावेळी घेण्यात आला.

0000

Featured post

Lakshvedhi