Monday, 19 January 2026

१० लाख भाविकांची उपस्थिती; आंतरराष्ट्रीय महत्त्व

 १० लाख भाविकांची उपस्थितीआंतरराष्ट्रीय महत्त्व

हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक ऑनलाईन माध्यमातून म्हणाले,की हा कार्यक्रम देश-विदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.या महासोहळ्यात केवळ शीख समाजच नव्हे,तर सिकलीगर,बंजारा,लबानासिंधी,मोहयाल,वाल्मिकी,उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाज असे मिळून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रसिद्धीची व्याप्ती मोठी असावी.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

 सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नियोजनावर भर दिला.ते म्हणाले,की मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा (समाज माध्यमे) प्रभावी वापर करून राज्यासह राज्याबाहेरही या कार्यक्रमाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

 'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

नांदेडदिनांक १८ (जिमाका) : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादरश्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक 'शहीदी समागमसोहळ्याचे विचार   खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत,असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत श्री.पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले.गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर द्याअसेही ते म्हणाले.

            शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे श्री.पापळकर यांनी नमूद केले.शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी,निबंध,चित्रकला,प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा.तसेच,शासकीय कार्यालयेपेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी,अशा सूचना त्यांनी दिल्या.

वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय

सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

मुंबईदि. १८: सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या प्रतिनीधींना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते.

विविध ४० देशांतून आलेल्या फेलोंचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्री. गवांदे यांनी स्वागत करीत भारताच्या विविधांगी संस्कृतीचे महत्व विषद केले. त्यांनी मुंबईचे जागतिक आणि भारतातील महत्व अधोरेखित करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती दिली.

यावेळी लावणीपंढरपूर वारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतनाट्य सादर करण्यात आले.


वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय

सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

मुंबईदि. १८: सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या प्रतिनीधींना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते.

विविध ४० देशांतून आलेल्या फेलोंचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्री. गवांदे यांनी स्वागत करीत भारताच्या विविधांगी संस्कृतीचे महत्व विषद केले. त्यांनी मुंबईचे जागतिक आणि भारतातील महत्व अधोरेखित करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती दिली.

यावेळी लावणीपंढरपूर वारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतनाट्य सादर करण्यात आले.

0000

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी

मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

 

मुंबई दि. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

        

ही एकांकिका स्पर्धा यावर्षीपासून फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कोकण विभागातील स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी२०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिरमाटुंगा येथे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ही स्पर्धा पुणेअमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांत प्राथमिक फेरीच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या नाट्यसंघांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

 

प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या संघांमधून प्रत्येक विभागातून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असूनअशा प्रकारे एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत. 

       

विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण प्राथमिक फेरी निशुल्क ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाट्यसंघांनी व रसिक प्रेक्षकांनी या एकांकिका स्पर्धेतील नाटकांचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

     

मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणेएकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणेहाच या भव्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

 इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना


‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

Featured post

Lakshvedhi